आजी – माजी आमदारांच्या घराजवळ भर दिवसा वृध्देची सोन्याची चैन हिसकली – २ आरोपींना चांदूर रेल्वे पोलीसांनी ५ तासांतच केले जेरबंद

412
जाहिरात
१ आरोपी फरार
चांदूर रेल्वे पोलीसांची दमदार कामगिरी
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
  काही दिवसांपुर्वी शहरात भरदुपारी आठवडी बाजारातील एका दुकानातुन १८ हजारांची रक्कम उडविल्याची घटना घडली होती. यानंतर पुन्हा भरदिवसा चोरीची घटना शहरात घडली आहे. शहरातील आजी – माजी आमदारांच्या घराजवळ राहणाऱ्या एक वृध्द महिलेची घरात घुसुन गळ्यातील सोन्याची चैन लंपास केल्याची घटना स्थानिक जिजामाता कॉलनी (ढोले कॉलनी) मध्ये सोमवारी (ता. २२) सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान घडली. चांदूर रेल्वे पोलीसांनी या घटनेचे गांभिर्य पाहता कसुन चौकशी करीत फक्त ५ तासांत या चोरीचा छडा लावुन दोन आरोपींसह चोरीसाठी वापरली दुचाकी जप्त केली असुन १ आरोपी फरार आहे.
      प्राप्तमाहितीनुसार, स्वर्गीय माजी आमदार यांच्या घराबाजुला व तथा सद्याचे आमदारांच्या घराजवळ राहणाऱ्या श्रीमती लिलाबाई विश्वासराव जगताप (८१) ह्या सोमवारी घटनेच्या वेळी घरी एकट्या होत्या. त्यांच्या घरी राहणारी एक मुलगी सकाळी कॉलेजला निघून गेल्यानंतर घरावर लक्ष ठेवून असणारे ऋषीकेश राजीव राऊत (वय १८), निखील हिम्मत कावरे (वय १९) दोघेही रा. वाई व सुरज मोहोड रा. दिपोरी (वय १८) हे तिघे पल्सर २२० या एमएच २७ बीएल ९१४६ क्रमांकाच्या दुचाकीने सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान श्रीमती जगताप यांच्या घराजवळ आले. यानंतर आरोपी ऋषीकेश राऊत व निखील कावरे या दोघांनी थेट समोरील दरवाज्यातुन आत प्रवेश केला व श्रीमती लिलाबाई जगताप यांचे हाथ पकडुन एकाने गळ्यातील १० ग्रॅम सोन्याची चैन ओढून गाडीने फरार झाले. सदर घर धामणगाव रेल्वेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असुन यावरून नेहमीच वर्दळ असते. तरीही मोठी हिंमत करून घरात घुसुन चैन चोरी केल्यामुळे पोलीसांसमोर मोठे आवाहन निर्माण झाले होते. या घटनेची तक्रार फिर्यादी हेमंत विश्वासराव जगताप (४५) यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला दिली. एका शहरवासीयाने पोलीसांना चोरांची गाडी पाहल्याचे सांगुन गाडीबद्दल माहिती दिली. यानंतर पोलीसांनी तपास चक्रे वेगाने फिरवत केवळ ५ तासांत या चोरीचा छडा लावून ऋषीकेश राऊत व निखील कावरे या दोघांचा अटक केली. अमरावतीवरून आलेल्या डॉगस्कॉडने आरोपींना ओळखण्यामध्ये पोलीसांची मदत केली. तसेच चोरीकरीता वापरण्यात आलेली पल्सर २२० सुध्दा जप्त करण्यात आली असुन सुरज मोहोड हा फरार आहे. तसेच चोरलेली सोन्याची चैन सुध्दा जप्त केली आहे. केवळ ५ तासांत आरोपींना  अटक करून चांदूर रेल्वे पोलीसांनी दमदार कामगिरी केली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जाधव, पीएसआय लसंते, फुलेकर करीत आहे.
अजुन चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता 
अटक आरोपींची चांदूर रेल्वे पोलीसांनी कसुन चौकशी केल्यास अजुन काही चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुसऱ्या काही चोऱ्या पुढे येणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।