सुरक्षा रक्षकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन प्रदान करावे……. प्रहारची मागणी

0
1205

प्रतिनिधी / अमरावती – 
जिल्ह्यातील डॉ पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनी अमरावती येथे कार्यरत असलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन व इतर सेवा सुविधा मिळत नसल्याने पिळवणूक होत असल्याबाबत.तसेच कार्यरत खाजगी सुरक्षा रक्षकांना अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात समाविष्ट करण्याबाबत प्रहार कामगार संघटनेच्या वतीने प्रदिप वडतकर यांनी सहाय्यक कामगार आयुक्त अनिल कुटे यांना निवेदन सादर केले होते .त्या अनुषंगाने आज सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालणात बैठक बोलावण्यात आली होती.सदर बैठकीला प्रहार कामगार संघटनेचे चिटणीस प्रदिप वडतकर, जिल्हाप्रमुख धोटू महाराज वसू , प्रबोधनीचे निशद पांधारकर उपस्थित होते.सदर बैठकीत दोन्हीही उभय पक्षांची चर्चा झाली. उपस्थित उभय पक्षांनी आपली मते बाजू मांडली सहाय्यक कामगार आयुक्त यांनी संबंधित विषयाबाबत संपूर्ण चौकशी करुन प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही बैठकीत उपस्थितींना दिली.परंतु प्रहार कामगार संघटनेच्या वतीने प्रदिप वडतकर यांनी प्रबोधनी सह संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथील खाजगी सुरक्षा रक्षकांना सुध्दा किमान वेतन कायद्यानुसार वेतन व इतर सेवा सुविधा मिळत नसल्याने पिळवणूक होत असल्याने किमान वेतन कायद्यानुसार त्यांना किमान वेतन व इतर सुविधा त्वरित लागू कराव्यात ही प्रशासकीय बाब आहे तसेच ही बाब प्रशासकीय दृष्टीने गंभीर स्वरूपाची असून सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी तसेच सुरक्षा रक्षक कामगारांचे आर्थिक व शारीरिक नुकसान होऊ नये,म्हणून कार्यरत असलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांना अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात समाविष्ट करण्यात यावे. मागणी लावून धरत संबंधितावर कार्यवाही करावी अन्यथा प्रहारच्या वतीने अन्याय विरोधात दाद मागण्या साठी आंदोलनाची तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बैठकीला सहाय्यक कामगार आयुक्त अनिल कुटे प्रबोधनीचे निशद पांधारकर, प्रहार कामगार संघटना चिटणीस प्रदिप वडतकर सह जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू , सुधिर उगले ,गौरव ठाकरे , संजय कदम , सुरेंद्र बोरकर, अजय वाकोडे ,अमोल शंकरपाडे,दिपक बाभणे, चंदु वढरकर, प्रकाश झगडे, रामेश्वर घटारे, रमेश वनवे, शंकर पडोळे, नंदू गुल्हाने, योगेंद्र वानखडे , कैलास आठवले, आकाश ढोके, विलास बरवे , राजकूमार लांडगे, महेश वाघमारे , हरिष खरडे, भारत कलाने, नरेश धुर्व, प्रशांत देवतळे, सचीन लोखंडे, शुध्दोधन राऊत, देवेंद्र वानखडे आदी पदाधिकारी व कार्यकत्यांची उपस्थिती होती …..