प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक संघटनेचे एक दिवसीय धरणे आंदोलन – रोख सबसिडी लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार देण्याच्या शासन निर्णयाचा विरोध

0
747
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतलेल्या रोख सबसिडी लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार देण्याच्या शासन निर्णयाचा विरोध प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक संघटनेने केला असुन या विरोधात सोमवारी चांदूर रेल्वे तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
    महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने २१ ऑगस्ट २०१८ व २९ सप्टेंबर २०१८ रोजी थेट लाभ हस्तांतरण (रोख सबसिडी) लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार देण्याचा शासन निर्णय घेतला आहे. या संदर्भात २९ सप्टेंबर रोजी मार्गदर्शक अंमलबजावणीसाठी परिपत्रक काढले असुन याचा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक संघटनेने विरोध केला आहे. याची अंमलबजावणी होऊ नये यासाठी चांदूर रेल्वे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक यांनी तहसिल कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करून थेट लाभ हस्तांतरण लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार देण्याचा शासन निर्णय रद्द करून सहानुभूतीपुर्वक विचार करून न्याय देण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसिलदार बि. एन. राठोड यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीधर धावडे, रमेश इंगळे, राजेंद्र राजनेकर, पुरूषोत्तम बन्सोड, गोलु चित्तरकार, सुरेंद्र शिंदे, दिलीप गुल्हाणे, मनोहरराव गुल्हाणे, संजय निंबर्ते, प्रेमचंद मेहर, माणिक पनपालीया, सचिन रॉय, पंकज फुलाडी, दिपाली काळमेघ, माला पुडके, मुरलीधर होले यांसह तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक उपस्थित होते.