उच्च शिक्षित मोटारसायकल चोरट्याच्या टोळीच्या अकोट शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0
1696

आकोट/ प्रतीनिधी

आकोट शहर पोलिसांनी शहरातुन सातत्याने चोरी होणाऱ्या मोटार सायकलींचा तपास करतांना शहरातीलच उच्चशिक्षित मोटर सायकल चोरट्याच्या टोळीच्या मुसक्या आळवल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे.समाजातील तरुण मुले किरकोळ कारणावरून चोरी सारख्या गंभीर गुन्ह्या कडे वळत असून त्या मध्ये उच्च शिक्षण घेतलेली तरुण मुले सुद्धा सामील असल्याचे वास्तव अकोट शहर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या चोरी च्या या गुन्ह्यातून समोर आल्याने समाज व पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक झाले आहे हे अश्या घटनांवरुन दिसुन येत आहे.सविस्तर वृत्त असे की पोलिस स्टेशन अकोट शहर येथे फिर्यादी राजेश वासुदेव राव वानखेडे रा. राजदे प्लॉट अकोट, ह्यांनी फिर्याद दिली होती की ते राहत असलेल्या पुर्वाज अपार्टमेंट मधील पार्किंग मधून काही दिवसांपूर्वी त्यांची हिरो होंडा मोटार सायकल क्रमांक MH30 AD 7846 किंमत 49,000 ही कोणी तरी अज्ञात इसमाने चोरून नेली होती, सुरवातीला त्यांनी काही दिवस शोध घेतला ,मिळून न आल्याने पोलिस स्टेशन अकोट शहर येथे फिर्याद दिल्या वरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला, तपास सुरू असताना ,अकोट शहर च्या गुन्हे शोध पथकाला खात्रीलायक माहिती मिळाली की अकोट शहरातील टाकपूरा येथे राहणारा धनराज (गुड्डू) महेश जोशी हा तरुण विना कागदपत्रांच्या मोटार सायकली विकत आहे, त्या वरून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पुढे आलेली माहिती अशी की धनराज जोशी हा तरुण Bsc कॉम्पुटर झाला असून दीड वर्षा पूर्वी पुणे येथे नोकरी ला सुद्धा लागला होता, परंतु कंपनीत पगार कमी होता, त्यातच सिल्वासा येथे जात असताना तो चालवीत असलेल्या त्याचे मित्राच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला व कार चे बरेच नुकसान झाले, ते नुकसान भरून देण्या साठी त्याने, अकोला येथील एका व्याजाने पैसे देणाऱ्या व्यक्तीकडून 20,000 हजार रुपये कर्ज घेतले, ते कर्ज 1 वर्षा च्या आत फेडू न शकल्याने व पैश्याची व्याजासह परतफेड करण्याचा तगादा सुरू झाल्या मुळे, सर्व प्रथम अकोला येथील बसस्टँड जवळून मोटार सायकल चोरली व 17,000 हजारात अकोट ला विकली, त्या नंतर अश्या आणखी तीन मोटार सायकली , अकोट मधीलच त्याचे मित्र वैभव मोझेस गायकवाड वय 22, राहणार हिवरखेड रोड अकोट, प्रणय अनिल तेलगोटे वय 20,राहणार जलतारे प्लॉट अकोट ह्यांचे मदतीने चोरल्या , त्याने दिलेल्या कबुलीवरून इतर 2 आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली असून त्यांचे कडून1) हिरो होंडा प्लेसर मोटारसायकल क्रमांक MH 30AD 7846 किंमत 49,000 2) होंडा ड्रीम योगा मोटार सायकल खोटा क्रमांक टाकलेला किंमत 50,000, 3) हिरो हंक मोटारसायकल खोटा क्रमांक टाकलेली किंमत 50,000 4) हिरो होंडा CD डीलक्सकिंमत 30,000 5)नवीन पल्सर मोटारसायकल 7 महिन्या पूर्वी घेतलेली, सध्याची किंमत अंदाजे 70,000 रुपये रुपये अश्या एकूण 2,49,000 रुपयांच्या ५ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून तिन्ही ओरोपींना आज विद्यमान न्यायालया समोर उभे करून पोलिस कोठडी घेऊन अकोट शहरातील चोरी गेलेल्या मोटार सायकली चा छडा लावण्यात येणार आहे ही कारवाई अकोट शहरचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, हेड कॉन्स्टेबल संजय घायल, कर्मचारी राकेश राठी, गोपाल अघडते, सुलतान पठाण,विजय सोळंके ह्यांचे पथकाने केली.