अखेर चांदूर रेल्वे येथे नाफेड द्वारे मुंग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन नोंदणीला सुरुवात – नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

0
604
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान  ) 
       चांदूर रेल्वे येथील केंद्रावर दोन वर्षांपासून नाफेडव्दारे सब एजंट म्हणून मान्यता होती. परंतु चालू वर्षी चांदूर रेल्वे केंद्राला नाफेड द्वारे काळ्या  यादीत समाविष्ट करून ऑनलाइन नोंदणी रद्द करण्यात आली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसानंतर अखेर चांदूर रेल्वे येथील खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात शेकडो शेतकऱ्यांच्या समक्ष मुंग, उडीद व सोयाबीनच्या ऑनलाईन नोंदणीला गुरुवार २५ ऑक्टोंबर पासून प्रारंभ झाला. यावेळी व्यवस्थापक सुरेश ढाकुलकर, प्रभाकर इखार, वानखडे हजर होते.
         खरीप हंगाम सुरू होऊन शेतकऱ्यांचा उत्पादित माल केंद्र बंद असल्याने खरेदी बंद होती. परंतु या बंदच्या कालावधीत गरजू शेतकऱ्यांना आपला शेतमाल व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल नाफेडला विक्रीसाठी आला तर महसूल अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची चर्चा नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांत होती.