दहशत माजविण्यासाठी रिव्हॉल्वर बाळगण्याऱ्यास अटक

0
714
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी, पुणे

फरासखाना पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील आणि कर्मचारी हे त्यांच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पो.ना.शंकर कुंभार व अमोल सरडे यांना त्यांच्या बातमीदाराने माहिती दिली कि स्वप्निल राम मोरे वय २८, रा, नारायण पेठ हा कंबरेला रिव्हॉल्वर लावून फिरत आहे त्याला पोलिसांनी फिरत असताना अटक करण्यात आली आहे.  

याबाबतची सविस्तर माहिती अशी कि, फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील व त्यांचे पोलीस कर्मचारी हे त्यांच्या हद्दीत नेहमीप्रमाणे गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या अनुषंघाने  पेट्रोलिंग करत असताना पोलीस कर्मचारी कुंभार व अमोल सरडे यांना त्यांच्या खबरी नेटवर्क मधून माहिती मिळाली कि ,आरोपी स्वप्नील राम मोरे हा कमरेला रिव्हॉल्वर  लावून फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी खात्री करत असताना पोलीसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 30,८००/ रु.चा  हत्याराचा माल मिळाला. याबात त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने अशीच दहशत माजविण्यासाठी जवळ बाळगले होते अशी माहिती दिली.

    सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, परीमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे संभाजी शिर्के, सुनील गवळी , पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पो.ह. बापू खुटवड, केदार आढाव, विनायक शिंदे, अमोल सरडे, शंकर कुंभार, अमेय रसाळ, गणेश ढगे, सयाजी चव्हाण, महावीर वलटे, हर्षल शिंदे, दिनेश भांदुर्गे, विशाल चौगुले, विकास बोऱ्हाडे, मोहन दळवी, आकाश वाल्मिकी, मयूर भोकरे यांच्या पथकाने केली.