महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा मुलानांसाठी सवलतीच्या दरात शालेय वाहतूक सेवा सुरू

0
1113
Google search engine
Google search engine

औरंगाबाद (प्रतीनिधी)

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे कांचनवाडी येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या मुलांना सवलतीचा दरात शाळा कॉलेज ला येण्या जाण्यासाठी वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ औरंगाबादचे पोलीस उपायुक्त गोवर्धन कोळेकर आणी आरटीओ (औरंगाबाद) श्रीकृष्ण नखाते साहेब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करून बस सेवा सुरू करण्यात आली. हा कार्यक्रम कांचनवाडी येथे सकाळी 11 वाजता करण्यात आला उदघाटन प्रसंगी आर टी ओ श्रीकृष्ण नखाते साहेब यांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने समाजाच भान ठेवून जी स्कूलबस सेवा सुरू केली आहे. हे कार्य अत्यंत कोैतुकास्पद आहे “शेतकरी जगला तर देश जगेल” आणि आज राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती सामना करावा लागत आहे त्या साठी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने फार मोठा वाटा घेतला आहे. तर उपायुक्त गोवर्धन कोळेकर यांनी बहुसंख्य पोलीस हे शेतकऱ्यांची मुलं आहेत. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे जेवढे कौतुक करावं तितकं कमी आहे. कुठल्याही पक्षाची मदत न घेता एक सामाजीक बांधिलकी म्हणून आपण हे कार्य करत आहेत ही एक मोठी गोष्ट आहे. असे त्यांच्या भाषणातून सांगितले. मराठवाड्यात पाणी प्रश्न उद्भवणार आहे आपण सर्वांनी पाणी जपून वापरायला हवं. या वेळी नगरसेवक जनार्धन कांबळे यांनी उपस्थित कार्यकर्माला लाभली या स्कूल बस एन डी ट्रान्सपोर्ट च्या आहेत. त्यांचं सहकार्याने ही सेवा पोलिस बॉईज ने सुरू केली आहे. या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष रवि वैद्य, भुपेश पाटील, सुनीला क्षत्रिय, ज्ञानोबा धुमाळ, गोकुळ दाभाडे, दत्तात्रय धोकटे, शिरीष चव्हाण, सखाराम भोजने, माधुरी चौधरी, अँड सुनीता घुनावत, मीनाक्षी पवार, मीना हाके, लक्ष्मी कबाडे, रंजिता निकाळजे, सविता मगरे, अशोक जाभलकर, अमोल काळे, पवन लांडगे, अभिषेक वैराळ,
सागर बनसोडे, अक्षय तळेकर, रामेश्वर कुराडे, या कार्यक्रम वेळी प्रास्तविक राज ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन नाना देसाई यांनी केलं