अस्मितादर्श साहित्य संमेलनात प्रा.राजा जगताप यांच्या कथेने जिंकली मने

0
657

——————————————

अस्मितादर्श साहित्य संमेलनात प्रा.राजा जगताप यांच्या कथेने जिंकली मने

उस्मानाबाद (प्रतिनिधी)दि.२८३५वे अस्मितादर्श साहित्य संमेलन २०१८चे जालना येथे २७व२८ आॅक्टोंबर या रोजी,संमेलनाध्यक्ष मा.डी.बी.जगत्पुरिया व स्वागताध्यक्ष मा.डाॅ.संजय लाखे पाटील .उदघाटक मा.डाॅ.सुखदेव थोरात,मा.डाॅ.श्रीपाल सबनीस,माजी मंञी डाॅ.नितीन राऊत,डाॅ.निवेदिता पानतावने संपादक ,अस्मितादर्श.यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे .दि.२७/१०/१८ रोजी कथा—कथनासाठी निमंञित कथाकारांच्या कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न झाला.यात उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा.राजा जगताप यांनी त्यांच्याच”आभाळ”कथासंगृहातील “परिवर्तन” कथा —कथन केली उत्कृष्ट पध्दतीने कथाकथन केल्याने सभागृहातील श्रोत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.कथाकथनाने प्रा.राजा जगताप यांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली.या सञाच्या अध्यक्षस्थानी कथाकार विजय सिंदगीकर होते.या सञात अर्जुन व्हटकर,के.व्ही.सरवदे,अ.फ.भालेराव,संघमिञा खंडारे,यांनी कथा सादर करून रसिकांची मने जिंकली.यावेळी समेलनाचे सचिव राम गायकवाड,डाॅ.विजय कुमठेकर,,कैलाश माने,सुनंदा तिडके,डाॅ.के.जी.सोनकांबळे,कैलाश भाले,डाॅ.कालिदास सुर्यवंशी पंडित कांबळे,रमेश बोर्डिकर,प्रा.गोपाळे उपस्थित होते.