अकोट शहर पोलिसांची मोठी कारवाई…लाखो रुपये किमतीचे 850 किलो गोवंश मास केले जप्त…

0
750

आकोट/ प्रतिनिधी
स्थानिक शौकत अली चौकातील कुरेशी पुरा येथे आज दिनांक 28।10।18 रोजी अकोट शहर पोलिसांनी भल्या पहाटे अचानक धाड मारून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या कत्तल केलेले गोवंश मास जप्त केल्याने अकोट शहरात एकच खळबळ उडाली असून अवैध कत्तल करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे । अकोट शहरातील कुरेशी पुरा येथे बऱ्याच वर्षा पासून जनावरांची कत्तल केल्या जाते, कुरेशी पुऱ्यातील कुरेशी समाजातील मुस्लिम लोकांचा तो पारंपरिक वयवसाय आहे, जो बऱ्याच वर्षा पासून सुरू आहे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कुरेशी समाजातील लोकांची बऱ्याच वेळेस मीटिंग घेऊन गोवंश प्राण्यांच्या अवैध कत्तल ही प्रस्तावित कायद्याचा भंग असून, अवैध कत्तल न करता दुसरा पर्यायी वयवसाय करावा ह्या संभधाने वेळो वेळी प्रबोधन सुद्धा केले परंतु कुरेशी समाजातील काही लोक हा वयवसाय सोडायला तयार नसल्याने पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी वेळो वेळी मोठ्या धाडी सुद्धा मारल्या, मागे 1 महिन्या पूर्वी जवळपास 1000 किलो गोवंश मास सुद्धा जप्त करण्यात आले होते, तरी सुद्धा चोरून लपून अवैध कत्तल सुरूच असल्याची माहिती मिळाल्या वरून आज भल्या पहाटे 5 वाजता पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी कर्मचारी ह्यांनी अचानक कुरेशी पर्यंत धाड टाकून गोवंशाची अवैध कत्तल करणारे 1) वसीम अहमद जहुर अहमद वय 20 रा,कुरेशी पुरा, 2) जावेद अहमद खाजा मिया वय30 रा,आंबोळीवेस, 3) तौफिक अहमद अब्दुल हाफिज वय 21, रा कुरेशीपुरा, 4) अब्दुल रशीद अब्दुल हबीब वय 52, रा आंबोळी वेस , 5) इरफान अहमद अब्दुल मजीद वय 35, कुरेशीपुरा ह्यांना ताब्यात घेऊन 7 कुऱ्हाडी, 7 सुरे, व 850 किलो गोवंश मास एकत्रीत किंमत 1,70,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन आरोपींना विद्यमान न्यायालयात उभे करुन 2 दिवसाचीपोलिस कोठडी मागण्यात आली असून पुढील तपास करण्यात येणार आहे, सदरची कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात साहाय्यक पोलिस निरीक्षक दयनोबा फड, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश पाटील, हेड कॉन्स्टेबल संजय घायल, शिंदे, पोलिस कर्मचारी अघडते, पठाण, वीरेंद्र लाड, सोळंके, बेले, नरवाडे,
चिंचोळकर व महिला कर्मचारी गीता ह्यांनी कामगिरी पार पाडली.