राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

0
760

एक हजार रुग्णांणी केली तपासणी

 

अनिल चौधरी, पुणे 

 राष्ट्रवादी काँगेस पक्षातर्फे व नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने , स्वप्नील दुधाने यांच्या वतीने पुण्यातील कर्वेनगर मधील सम्राट अशोक विद्यालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये एक हजार नागरिकांनी आपल्या विविध प्रकरच्या तपासण्या करून घेतल्या.

     नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात कान नाक घसा, जनरल फिजिशियन, डोळे तपासणी , स्त्री रोग तपासणी, त्वचा रोग, हृदयरोग तपासणी, रक्ताच्या विवीध तपासण्या ईसीजी, फुफुसे तपासणी, कॅन्सर तपासणी , ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, पाळी संबंधित तपासणी अशा विविध आजारांवरील मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले तर  राष्ट्रवादी डॉकटर सेलच्या अध्यक्षा सुनीता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले.

  या शिबिराला मोलाचे सहकार्य केले ते ससून हॉस्पिटलचे डॉ. अजय तावरे , देवयानी हॉस्पिटल, श्री मॅटर्नरिटी नर्सिंग होम ,पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ.राम हंकारे, न्युक्लीयस पॅथॉलॉजी लॅबरोटरी चे डॉ. पवार, प्रतिभा चौधरी तसेच इतर आरोग्य सेवकांनी विशेष सहकार्य करून शिबीर यशस्वी केले.

    यावेळी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने , स्वप्नील दुधाने, डॉ. सुनीता काळे, परशुराम सूर्यवंशी, कळमकर, किशोर कांबळे, उर्मिला गायकवाड, मिलिंद बालवडकर, संतोष बराटे, अनंत तांबे, गौरी गायकवाड तसेच सिद्धार्थ बराटे आदी उपस्थित होते.