उद्योजक देवदत्त मोरे यांच्या हस्ते रामलिंग मंदिराचे सोनेरी कलशारोहण शुक्रवारी होणार

0
888
Google search engine
Google search engine

उद्योजक देवदत्त मोरे यांच्या हस्ते रामलिंग मंदिराचे सोनेरी कलशारोहण शुक्रवारीहोणार

उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील सर्वधर्मिय तिर्थक्षेत्र असलेले येडशी येथील ग्रामदैवत रामलिंग मंदिराच्या कलशाला सोन्याने मडवले आहे त्यामुळे आता हा कलश चमकणार आहे. उद्योजक देवदत्त मोरे यांनी बांधलेल्या मंदिराच्या शिखरावर शुक्रवारी २ नोव्हेंबर रोजी सोन्याचा मुलामा दिलेल्या कलाशाचा कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उद्योजक देवदत्त मोरे यांच्या हस्ते पार पडणार्‍या कलशारोहण कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंदीर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.येडशी येथे देवदत्त मोरे फौंडेशनच्यावतीने विविध सामाजिक विकासाची कामे करण्यात आली आहेत. येडशी गावात ५० लाख रूपये खर्चून लिंगायत समाजासाठी समाजमंदीर, मुस्लिम समाजाच्या दफणभूमीचा प्रश्न, वारकरी सांप्रदायास आर्थिक मदत, निराधार, एकल महिलांना शिलाई यंत्राचे वाटप, अपंगांना सायकलींचे वाटप, असे विविध सामाजिक कामे मोरे यांनी केली आहेत.मराठवाड्यासह राज्यभरातून श्रीक्षेत्र येडशी येथील रामलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतात. या मंदिराच्या शिखराचे बांधकाम देवदत्त मोरे यांच्यावतीने करण्यात आले. निसर्गरम्य आणि अभयारण्यात असलेल्या या मंदिराच्या शिखरावर सोन्याचा मुलामा असलेला कलश सवार्ंचे लक्ष वेधून घेत आहे. शुक्रवारी दुपारी 1 वाजता देवदत्त मोरे यांच्या हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाची मंदिर समितीकडून जोरदार तयारी सुरू असून भाविकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समिती व देवदत्त मोरे फौंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.