*पद्मश्री डॉ मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट तर्फे पुरस्कार प्रदान*

0
1273

जळगाव :/

नेहरू युवा केंद्र युवक कल्याण, क्रीडा मंत्रालय भारत सरकार सलग्नित पद्मश्री डॉ मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, उरळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांच्यातर्फे सामाजिक, आर्थीक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा उत्तम ठसा उमटवणाऱ्यांना ” राष्ट्रीय एकात्मता दिन व सरदार वल्लभभाई पटेल जयंती ” च्या निमित्ताने ” भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार ” व ” पद्मश्री डॉ मणिभाई देसाई शिक्षक गौरव पुरस्काराने ” सन्मानित करण्यात येते

दिनांक ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील अजित निळकंठ चौधरी (जळगाव), प्रसन्ना प्रभाकर बोरोले (भुसावळ), ललित पांडुरंग चौधरी (जळगाव) यांना “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार २०१८” ने व योगेश मोहन इंगळे (भुसावळ), प्रफुल्ल वासुदेव सरोदे, चंद्रकांत वना पाटील, निखिल लक्ष्मण जोगी, चैताली प्रल्हाद पाटील, स्वाती धनंजय फिरके (जळगाव) यांना ” पद्मश्री डॉ मणिभाई देसाई शिक्षक गौरव पुरस्कार २०१८ ” ने सन्मानित करण्यात आले

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष प्रसिद्ध समाजसेवक,सोशल रीफॉर्मर, प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक जनशक्ती चे संस्थापक कुंदन ढाके , प्रसिद्ध युवा उद्योजक मिलिंद चौधरी ,गोविंदा लोखंडे , धनंजय फिरके, ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ अशोक पाटील आदी उपस्थित होते