सेवानिवृत्त वीरांचे शेगावं नगरीत जंगी स्वागत

0
1014

शेगांव :- आज संत नगरीत रेल्वे स्टेशन वर महाराष्ट्र एक्स्प्रेस चे आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात देशाची अविरत सेवा करणाऱ्या भारत मातेच्या विर सुपुत्रांचे स्वागत करण्यात आले.
आपल्या आयुष्यातील २८ वर्ष देश सेवेत घालून देशाची सेवाकरून आपल्या गावी परत आले सुभेदार प्रदीप नामदेव वाकडे आणि सैनिक अनिल हरिदास सोनोने यांनी आरमीची सेवापूर्न करून दिनांक २ नोव्हेंबर रोजी सकाळी महाराष्ट्र एक्स्प्रेसने आगमन होताच ट्रान्सपोर्ट इन्स्पेक्टर मोहन देशपांडे व रेल्वेचे पोलीस अधिकारी ठाणेदार भोये यांनी त्याचे स्वागत केले शिवाय त्यांचे जवळचे मित्र श्री समृद्धी महिला नागरिक पत संस्थांचे व्यवस्थापक एस. आर. धानोकार यांनी या विरपुत्रांचे मानसन्मानात फटाके व ढोल तासे वाजाऊन या आनंद उत्सव साजरा केला या वेळी संपूर्ण स्थेशन वर असलेल्या लोकांनी या सैनिका सोबत हस्तांदोलन केले.

यावेळी दोन्ही सैनिकांचे परिवार व नातेवाईक शेगांव रेल्वे स्टेशन वर आतुरतेने त्यांची वाट पाहत होते.
त्या दोन्ही सैनिकांनसोबत आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली तेव्हा ते बोलले “आम्ही २८ वर्षे देशाची सेवा केली आता परिवार आणि आमच्या गावची सेवा करण्यात आम्ही आमचा वेळ घालू तसेच प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून एक व्यक्तीने देशसेवे साठी आर्मी, मिल्ट्री, पोलीस,नेव्ही मध्ये भरती व्हावे व देशाची निस्वार्थ सेवा करावी देश सेवेकरिता आम्ही कधीही सीमेवर जाण्यास तयार आहोत.” असे उद्गार या जवानांनी कडले
अश्या जवानांना आमचा सलाम !