लिंगायत समाजाच्या स्मशानभूमिच्या प्रश्नात झोपेचे सोंग घेणाऱ्या स्थानिक प्रशासनाला जागे करण्याची गरज-डॉ भारत पाटणकर

Google search engine
Google search engine

सांगली न्युज:सांगली जिल्ह्यातील वांगी तालुका कडेगांव येथील वांगी ग्रामस्थांच्या सामंजस्यातुन हा प्रश्न सोडवण्याची गरज लिंगायत समाजाच्या स्मशानभूमिच्या प्रश्नात झोपेचे सोंग घेणाऱ्या स्थानिक प्रशासनाला जागे करण्याची गरज आहे असे मत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ भारत पाटणकर यांनी वांगी येथे आयोजित करण्यात आलेल्या लिंगायत समाजाच्या मेळाव्यात व्यक्त केले. मा जिह्लाधिकारी काळम पाटील साहेब यांनी दफनभूमिच्या संदर्भात भुसंपादनाच्या दिलेल्या लेखी आदेशाबद्दल अभिनंदन केले परंतु मा जिह्लाधिकारी साहेब यांच्या आदेशाला केराच्या टोपल्या दाखवणाऱ्या कडेगावच्या स्थानिक प्रशासनाला खडे बोल सुनावले. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की ग्रामस्थ व सर्व पदाधिकारी यांच्या पाठबलावर्ती सामंजस्याची भूमिका घेवून हा प्रश्न सोडवावा .तसेच भारतीय कायद्याने जन्माला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या मृत्युनंतर नंतर त्या त्या समाजाच्या धार्मिक पद्धतीने त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध करण्याचा कायदा आहे .यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉ दिपक औंधे यांनी केले .सुरेश मोहिते,मोहनराव यादव,डॉ विजय होनमाने,परशुराम माळी,रामचंद्र औंधे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.यावेळी आप्पासो तेली,अजित हडडरे,महादेव शेटे,राहुल साळुंखे,रमेश एडके, नानासो माळी,बाबासो सूर्यवंशी,दाजीराम मोहिते,दिलीप सूर्यवंशी व सर्व पदाधिकारी व लिंगायत समाजाचे ग्रामस्थ उपस्तिथ होते.आभार हरिदास औंधे यांनी व्यक्त केले