चांदुर बाजार तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यासाठी अनेक संघटनांची निवेदन बारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन,चांदुर बाजार तालुका होणार का दुष्काळ ग्रस्त जाहीर.?

0
2557
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यासाठी अनेक संघटनांची निवेदन
बारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन,चांदुर बाजार तालुका होणार का दुष्काळ ग्रस्त जाहीर.

  1. चांदुर बाजार:-/बादल डकरे

सतत मागील 2 ते 3 वर्षेपासून महाराष्ट्र शेतकरी यांच्या समोर नैसगिर्क परिस्थिती शी लढा द्यावा लागत आहे.नुकतीच महाराष्ट्र राज्य सरकारने ने अमरावती जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्याची यादी प्रसिध्द केली असून या मध्ये चांदुर बाजार तालुका वगळण्यात आले असून याचा रोष तालुक्यातील संपुर्ण शेतकरी वर्ग मध्ये पाहायला मिळत आहे.तालुक्याला लागूनच असलेले अचलपूर आणि मोर्शी तालुका दुष्काळ जाहीर करण्यात आला मात्र चांदुर बाजार का वगळण्यात आले अशीही प्रश्न शेतकरी वर्ग यांच्या समोर उभा आहे.यासाठी चांदुर बाजार तालुक्यातील अनेक संघटना तसेच राजकीय पक्ष यांनी तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करन्यात यावा यासाठी तहसीलदार मार्फत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे.तर महाराष्ट्र बारी समाज अध्यक्ष यांनी थेट मुख्यमंत्री यांना भेटून चांदुर बाजार तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा यासाठी मागणी केली आहे.
तर दुष्काळ बाबत झालेल्या सर्वेक्षण बाबत शेतकरी वर्ग यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होते आहे.

प्रतिक्रिया:-
1)चांदुर बाजार तालुक्यात नैसर्गिक आपत्ती मूळे शेतकरी वर्ग हवादील झाला आहे.त्यात तालुका दुष्काळ ग्रस्त यादी मधून वगळ्यात आल्याने शेतकरी याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तर चांदुर बाजार तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करावा.
किशोर देशमुख तालुका कॉग्रेस अध्यक्ष
2)चांदुर बाजार तालुक्यात फारच अल्प प्रमाणात पावसाळा झाला आहे.त्यामुळे खरीप पिके हातून गेली आहे.त्याचप्रमाणे रब्बी पीक सुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे चांदुर बाजार तालुका लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा.अन्यथा कोणत्याही पूर्वसूचना न देता आगळेवेगळे आंदोलन करू.
अमोल गोहाड युवा गर्जना संघटना बोरगाव तळणी
3)मोर्शी -अचलपूर या दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. चांदुर बाजार तालुक्यात दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देऊन तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली आहे.
अशोक वसुले महाराष्ट्र बारी सेवा संघ महाराष्ट्र अध्यक्ष
4)चांदुर बाजार तालुक्या अनेक शेतकरी बांधव यांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे.चांदुर बाजार तालुक्यात येणाऱ्या सर्वच गावचे पुन:सर्वेक्षण करून संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा.आमची मागणी पूर्ण झाली नाही तर लोकशाही पध्दतीने तहसील कार्यालय समोर आंदोलन करू.
नाना आखरे भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत अध्यक्ष
5)*अमरावती जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या  दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहे .त्यामुळे शेतकरी बांधवांची भेट  घेऊन  चर्चा केली.शासनाने केवळ पाच तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणनू निवड केली आहे .सर्व अमरावती जिल्ह्यातच दुष्काळ सारखी स्थिती निर्माण झाल्याने सर्व अमरावती जिल्हाच दुष्काळग्रस्थ म्हणून घोषित करावे अशी मागणी खा.आनंदराव अडसूळ आजच मुख्यमंत्री व केंद्रीय कृषी मंत्री यांना केली आहे.*
आशिष वाटणे शिवसेना तालुका अध्यक्ष
6)
पावसाच्या अभावामुळे चांदुर बाजार तालुक्यातील सोयाबीन, उडीद,कपाशी,संत्रा याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.चांदुर बाजार तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.तरी लवकरात लवकर दुष्काळ ग्रस्त म्हणून चांदुर बाजार तालुका जाहीर करण्यात यावा.
किरण सिनकर भाजपा तालुका अध्यक्ष
7)चांदुर बाजार तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यासाठी जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले आहे.तरी इतर तालुक्याप्रमाणे चांदुर बाजार तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा.
नंदू विधळे शेतकरी संघटना चांदुर बाजार अध्यक्ष
8)दुष्काळ बाबत चा सर्वेक्षण ऑनलाइन पध्दतीने झाले आहे.त्यामुळे आम्ही आलेले सर्व दुष्काळ बाबत चे निवेदन स्वीकारून ते वरिष्ठांना पाठवीत आहे.
नीलिमा मते प्रभारी तहसीलदार चांदुर बाजार