ग्रामस्थांची मागणी : तुपारी येथे रेल्वे लाईनच्या कामामुळे १५० पेक्षा जास्त घरे निघणार : विस्थापित होणाऱ्या घरांना नुकसान भरपाई द्या

Google search engine
Google search engine

सांगली न्युज:सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील तुपारी येथे प्रस्तावित पुणे–मिरज रेल्वे ब्रॉडगेज कामामध्ये टाकण्यात येणाऱ्या दुसऱ्या लाईनमुळे १५० पेक्षा जास्त घरे विस्थापित होणार आहेत. सदर विस्थापित होणाऱ्या घर मालकांना रेल्वे लाईनच्या उत्तरेकडील बाजूला घरे बांधून द्या. पाडण्यात येणाऱ्या घरांची नुकसान भरपाई द्या. अशी मागणी तुपारी येथील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी डॉ.विजय देशमुख यांच्याकडे केली आहे.प्रांताधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत तुपारी येथील घरे विस्थापित होणाऱ्या ग्रामस्थांची बैठक झाली.तुपारी येथे रेल्वे लाईन जवळ गेली ४० ते ५० वर्षापासून ग्रामस्थ वास्तव्य करत आहेत. येथील ग्रामस्थ मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. ग्रामस्थांनी काबाडकष्ट करून घरे बांधली आहेत. मात्र आता मिरज–पुणे रेल्वे लाईन ब्रॉडगेजमुळे दुसरी लाईन टाकण्यात येणार आहे. या नवीन लाईनमुळे आमची घरे विस्थापित होणार आहेत. रेल्वेच्या अधिकार्यांनी आमची हक्काची घरे जमीनदोस्त करण्याची भूमिका घेतली आहे. कोणतीही पुर्व कल्पना व नोटीस न देता आमची घरे पाडली आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. आम्ही राहत असलेल्या रेल्वे लाईनच्या दक्षिणेकडील बाजू रेल्वेसाठी संपादित करू नये. तसेच जी घरे पाडली जाणार आहेत. त्या घरांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. नवीन घरे बांधण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी कडेगाव तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऑड.प्रमोद पाटील, विलास सावंत, नितीन इंगवले, दिनकर पाटील, विकास आडके, मोहन इंगवले, विनोद पवार, गणेश जाधव, संजय कावरे, नामदेव मोटे, अशोक आडके, अजित तडाखे, बबन कावरे, महादेव काटवटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.चौकट*कोणावर अन्याय होणार नाही : संग्रामसिंह देशमुख*रेल्वे लाईनच्या कामामुळे काही घरांना फटका बसणार आहे. कोणावरही अन्याय न करता योग्य मार्ग काढून सर्वांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.चौकटग्रामस्थांना विश्वासात घेवून कार्यवाही करा : ऑड.प्रमोद पाटीलरेल्वे लाईनच्या कामामुळे अनेकांना आपली घरे सोडावी लागणार आहेत. रेल्वे लाईनसाठी जागा संपादित करताना सर्वांना विश्वासात घेवून कार्यवाही झाली पाहिजे. अधिकार्यांची हुकूमशाही भूमिका सहन केली जाणार नसल्याचा इशारा कडेगाव तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऑड.प्रमोद पाटील यांनी दिला आहे.