जाणता राजा फेम आकोटचे विवेक राजे कोल्हे यांचे दुखद निधन…

0
982
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतीनीधी

छत्रपति शिवाजी महाराजांचा स्वराज्य संग्राम स्थानिक स्तरावर जाणता राजा नाटकातुन सादर करणारे आकोटच्या तरुणाईत धाडसी नेतृत्व म्हणुन परीचीत असणारे विवेक राजे कोल्हे यांचे काल दि.3 शनिवार रोजी दुखद निधन झाले.

अकोट शहरात सन २००४ मधे स्थानिक ५५६ कलाकार घेवुन “जाणताराजा” नाटक सादर करणारे विवेक राजे “महाराज”या नावाने आकोटात प्रसिद्ध होते,सुरवाती पासुन धाडसी क्रिडा प्रकारांसह ते ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन,अपत्कालीन हेल्पलाईन ,उत्तम घोडदौड स्वार म्हणुन नावाजलेले होते.साल1998नॅशनल फायरींग चॅपीयन 11महाराष्ट्र बटॅलीयन ला पिस्टल फायरींगमध्येही त्यांनी घवघवीत यश संपादित केले होते.

याशिवाय केलेच्या प्रांतात दिग्दर्शक,अभिनेता,कलाकार,ही होते.तर सामाजीक क्षेत्रातही त्यांनी आपले योगदान दिले.ते ,ब्लडडोनअर , सर्पमीत्र,देखील होते. एक आंदोलक ,सतत धडपड करणारा उर्जादायी तरुण म्हणुन ते युवा वर्गात प्रचंड लोकप्रिय होते.

विवेक राजेंच्या अकाली निधनाने आकोट शहरातील शिवप्रेमिंना दुखद भावनांचा धक्का बसला आहे.विवेक राजे कोल्हे हे गेल्या काही दिवसापासुन आजारी होते.मात्र लढवय्या स्वभावाच्या विवेक राजेंनी अखेरच्या श्वासा पर्यंतही आपली साहसी वृत्ती जपत जिवन मरणाच्या लढाईला झुंज दिली.अखेर नियतीने आकोटचे राजे हीरावले.मात्र ते तरुणाईला लढाऊ बाण्याच्या आदर्श देऊन अमर झालेत.