चला श्रमदानातुन जलसाठे श्रीमंत करुयात… प्रा.संदीप बोबडे

0
894

.आकोट/संतोष विणके

यंदा महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट घोंगावत आहे यात अकोट तालुक्याचे दुष्काळी यादित तालुक्याचे नाव नसल्यामुळे शेतीव्यवस्था आणखीनच भयांन झाल्याने दुष्काळाचे चित्र गडद झाले आहे.या दुष्काळ चित्र दुर व्हावे म्हणून संदिप बोबडे हे शिक्षक गेल्या तीन वर्षांपासून आदिवासी गावकरीसह आपली जलयात्रा पूर्ण करतो आहे श्रम ही श्रीराम है अस माननारे प्राध्यापक बोबडे तीन वर्षापासून आदिवासीबहुल भागात सुद्धा जलसंधारणासाठी कार्य करीत आहेत

या दिवाळीला त्यांनी प्रदूषण मुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी प्रचार प्रचार करणार असल्याचा संकल्प केलाअसुन श्रमदानातून जलसाठे श्रीमंत करून ही दिवाळी साजरी करण्यासाठी प्रचार प्रसार करणार असल्याचं त्यांनी सांगीतलं,पाण्याच्या जाणीव जागृतीसाठी समस्त तालुका वासी व शहरवासीयांना दिवाळीच्या त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.