अकलूज घोडे बाजाराचे उद्घाटन भारतीय घोड्यांना सुगीचे दिवस येतील – धैर्यशील

839

अकलूज घोडे बाजाराचे उद्घाटनभारतीय घोड्यांना सुगीचे दिवस येतील – धैर्यशील

रजनी साळवे / सोलापूर

सोलापूर प्रतिनिधी – येत्या ५ ते १० वर्षात भारतीय घोड्यांना सुगीचे दिवस येतील. शेतकर्यांनी गाई-म्हशींबरोबरच आता घोडीही पाळावीत. स्पर्धातर्गत वापराबरोबरच परदेशी बाजारपेठांमध्ये भारतीय घोड्यांना चांगली मागणी येत असल्याचे प्रतिपादन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले.दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर अकलूज़ घोडे बाजाराचे उद्घाटन खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, जि. प. सदस्या शितलदेवी मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, बाबाराजे देशमुख, अॅड. प्रकाश पाटील, रामचंद्र सावंत, मामासाहेब पांढरे, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, हेमलता चांडोले, राजेंद्र गावडे, कविता म्हेञे, प्रताप पाटील, अरूण तोडकर, फातिमा पाटावाला, संदिप घाडगे, त्रिभुवण धाईजे उपस्थित होते.धैर्यशील मोहिते-पाटील पुढे म्हणाले, शेतक-यांनी जातीवंत घोडे पाळावेत. त्यांची वंशावळ ठेवावी. भारतीय तसेच परदेशी बाजारपेठेत भारतीय घोड्यांची मागणी वाढत आहे. स्पर्धासाठी त्यांचा वापर वाढतो आहे. नाचकामासाठी घोडे वापरण्यापेक्षा त्यांना स्पर्धासाठी तयार करावे. जगभरात घोड्यांच्या सुमारे २०० जाती आहेत. मणीपुरी, काटेवाडी, मारवाडी व मिलीट्रीने विकसीत केलेल्या घोड्यांना सर्वत्र चांगली मागणी आहे.बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील म्हणाले, पंढरपूरला अडचण निर्माण झाल्यामुळे व्यापान्यांनी अकलूजला घोडे बाजार भरवण्यासाठी खा. मोहिते-पाटील यांच्याकडे विनंती केली होती. त्यामुळे अकलूजला घोडे बाजार सुरू करण्यात आला. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापायांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे दरवर्षी बाजार तेजीमध्ये भरतो आहे. शेतकन्यांना ३ टक्के दराने शेतमालावर कर्ज देणारी अकलूज बाजार समिती ही महाराष्ट्रातील पहिली बाजार समिती आहे. बाजार समितीच्या वतीने आंबा महोत्सवही घेतला जातो. लवकरच बाजार समिती अकलूज, नातेपुते व माळशिरस येथे पेट्रोल पंप सुरू करत आहे.सहकार महर्षिच्या १ लाख १ व्या साखर पोत्याचे पुजनसोलापूर प्रतिनिधी – रजनी साळवे सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या १ लाख १ व्या साखर पोत्याचे पुजन कारखान्याचे विद्यमान चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कारखान्याचा सिझन २०१८-१९ चा ऊस गळीत हंगाम दि. २२ ऑक्टोबर २०१८रोजी सुरू झाला. दि. ७ नोव्हेंबर अखेर १ लाख १२ हजार ९८१ मे. टन ऊसाचे गाळप होऊन १ लाख १ हजार ७५० साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ९.७४ टक्के व आजचा साखर उतारा १०.२९ टक्के आहे. प्रतिदीन ८ हजार मे. टनाने ऊस गाळप होत आहे.को-जनरेशन प्रकल्पामध्ये दि. ७ नोव्हेंबर अखेर ९६ लाख १२ हजार ६६६ युनिट विज निर्माण होऊन ५६ लाख ६२ हजार २५९ युनीट विज विक्री केलेली आहे. डिस्टीलरीमध्ये ६ लाख ९१ हजार २२४ लिटर्स रेक्टीफईड स्पिरीट उत्पादन झाले आहे. अॅसेटिक अॅसिड प्रकल्पामध्ये ९९ मे. टन ऑसिटाल्डीहाईड व ९९ मे. टन ऑसिटीक अॅसिडची निर्मिती झाल्याची माहिती चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.साखर पोती पुजनावेळी व्हा. चेअरमन प्रकाश पाटील, संचालक नामदेव ठोंबरे, लक्ष्मण शिंदे, सुरेश पाटील, धनंजय चव्हाण, शंकरराव माने-देशमुख, विजय माने-देशमुख, राजेंद्र मोहिते, विश्वास काळकुटे, चांगदेव घोगरे, भारत फुले, भिमराव काळे, सतिश शेंडगे, कामगार प्रतिनिधी संदिपान चव्हाण, नितीन निंबाळकर, भिमराव रेडे, रामचंद्र ठवरे, चंद्रशेखर दुरापे, मारूती घोडके, भाऊसाहेब जाधव, कारखान्याचे सभासद, खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी, युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरात