विजय महाडिक यांना पी.एच.डी. पदवी प्रदान

0
805
Google search engine
Google search engine

विजय महाडिक यांना पीएच.डी. पदवी प्रदानसोलापूर प्रतिनिधी : रजनी साळवे

अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे संशोधक विद्यार्थी विजय भारत महाडिक यांना सोलापूर विद्यापीठाकडून पीच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे.करडईवर आढळणान्या बुरशीजन्य जटील रोगाचे नियंत्रण व रोगाला प्रतिकार करण्यासाठी करडईमध्ये घडणारे संरक्षणात्मक जीवरासायनिक बदल या नाविण्यपूर्ण संशोधनावर आधारीत प्रबंध महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. एन. एस माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. सदर संशोधनामुळे सध्या करडईवर आढळणाच्या बुरशीजन्य जटील रोगांचे योग्य नियोजन व रोगाला प्रतिकारात्मक वाण वापरून करडईचे एकूण उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.महाडिक यांच्या यशाबद्दल खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, जि. प. सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील, प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांनी अभिनंदन केलेआहे.