लोकसभेचा आखाडा पेटणार ; उद्योजक मोरे यांच्या गावभेटी

0
993

लोकसभेचा आखाडा गाजविण्यासाठी उद्योजक मोरे यांच्या गावभेटी

बार्शी तालुका दौऱ्यात मल्ल मनोज माने यांचा चांदीची गदा देऊन सन्मानउस्मानाबाद- लोकसभेचा आखाडा गाजवण्यासाठी इच्छुक असलेले दानशुर व्यक्तीमत्व देवदत्त मोरे यांनी शनिवारी (दि१२) बार्शी तालुक्यातील दहा गावांना भेट देवुन आगळगाव येथील प्रसिद्ध सुंदिवली सादिकअली पीरसाहेब यांच्या उरसानिमीत्त आयोजित कुस्तीच्या फडातील प्रथम विजेता मल्ल मनोज माने यांचा श्री मोरे यांच्या हस्ते ५१ हजार रुपये रोख,अडीच किलोची चांदीची गदा व अभिमन्यु केसरी किताब देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मोरे यांनी आगळगावात भव्य शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली.कसबे तडवळे येथील प्रसिद्ध उद्योजक देवदत्त मोरे यांनी गेली सहा वर्षापासुन जिल्ह्यातील विविध भागात सामाजिक ,धार्मीक आणि शैक्षणिक कार्याला मोठा हातभार लावलेला आहे. या कार्याच्या आधारवर त्यांनी आगामी लोकसभा निवडनुक लढवण्याचा पक्का निर्धार केला आहे. त्यासाठी देवदत्त मोरे फाऊँडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याचा वेग वाढवुन संपर्कावर भर दिला आहे.त्याचाच एक भाग म्हणून शनावारी (दि१२)श्री मोरे यांनी बार्शी तालुक्यातील दहा गावाला भेट दिली.त्यात कुसळंब व उपळाई (ठोंगे)येथील श्री दत्त मंदिराला भेट देवुन ग्रामस्थासोबत गावच्या अडिअडचणी व विकासकामावर चर्चा केली.त्यानंतर त्यांनी खडकोणी या तंटामुक्त आणि गटारमुक्त गावाला भेट देवुन विकासकामासाठी गावाला सढळ हाताने मदत करण्याचे आश्वासन दिले.उंबरगे येथील मलीक बाबा दर्ग्याला भेट दिल्यानंतर सरपंच दादा विधाते यांनी देवदत्त मोरे यांचा ग्रामस्थातर्फे सत्कार केला.गाडेगाव ,देवगाव,भानसाळे या गावांना भेटीदिल्यानंतर सायंकाळी नऊ वाजताआगळगाव येथील सुंदीवली सादिकअली यात्रा महोत्सवानिमित्त आयोजीत कुस्तीच्या फडातील प्रथम विजेता मल्ल मनोज माने यांचा देवदत्त मोरे फाऊंडेशनच्या वतीने उद्योजक देवदत्त यांच्या हस्ते रोख ५१ हजार रुपये , अडीच किलोची चांदीची गदा व अभिमन्यु केसरी किताब देवुन गौरव करण्यात आला.यावेळी आगळगावचे सरपंच फिरोज मुजावर,खडकोणीचे सरपंच सचिन नलवडे,जिल्हा परिषद सदस्य किरण मोरे,ॲड.रोहीत डमरे,माजी जि.प.सदस्य गणेश डमरे, बबन गायकवाड, तडवळ्याचे माजी उपसरपंच नाना वाघ, आदेश मोरे, दत्तात्रय जगताप,पदम चौगुले,धनाजी होगले,सुरजपाशा शेख. राजेंद्र पवार,प्रा.गवळी यांच्यासह आगळगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.