स्व.संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट आणि जगदंब पब्लिक स्कुल चा सलग तिसऱ्या वर्षी उत्स्फुर्त असा उपक्रम- मेळघाट मधील अतिदुर्गम भागात शालेय साहित्य,कपडे,स्वेटर,फराळ,बिस्किट चे वाटप

0
889
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :-बादल डकरे –

संपूर्ण देशात दिवाळी सण साजरा झाला चिखलदरा तालुक्यातील रायपूर तसेच बोरताखेड्या या गावातील नागरिकांना जगदंब पब्लिक स्कुल तसेच स्व.संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट आणि मित्र परिवार तर्फे कपडे,शालेय साहित्य,साडी,स्वेटर चे वाटप करण्यात आले.
माणसाने माणसाची माणसासम वागणे याला माणुसकी म्हणतात.मात्र काळ ना रूप ही या ओळी फक्त वाचनात किंवा ऐकण्यात मिळतात.मात्र आयुष्य जगत असताना समाजाविषयी आपले काही देणे लागत तसेच आयुष्य दुसऱ्या साठी कसे जगता येतं याचे एक जिवंत उदाहरण मागील 3 वर्षापासून स्व संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट, आणि जगदंब पब्लिक स्कुल तर्फे समाजात दिले जात आहे.या मध्ये चांदुर बाजार येथील नागरिक त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत आहे.अतिदुर्गम भागात जाऊन त्या ठिकाणी दिवाळी साजरी करण्यात येत आहे.त्याच्या या उपक्रमाचे समाजमधून कौतुक होते आहे.
या गावायला जायला योग्य तसा रस्ता नाही.घनदाट आणि घाट वळणातून प्रवास वन्य प्राणी या सर्व गोष्टी मागे सोडून त्यानी चांदुर बाजार पासून अतिदुर्गम भागात चा प्रवास केला.या मध्ये त्यांना चांदुर बाजार तालुक्यातील अनेक नागरिकांना साहित्य गोळा करण्यास मदत केली.त्यामुळे हा उपक्रम यशस्वी रित्या पूर्ण झाला असल्याचे जगदंब पब्लिक स्कुल चे अध्यक्ष विनोद कोरडे यांनी सांगितले.

या मध्ये ट्रस्ट चे मित्र परिवार याचे फार मोलाचे कार्य लाभले.सेमाडोह येथून आत काही किलोमीटर चे अंतर पार केल्यानंतर रायपूर या गावात पोहचल्या अनेकांना एक वेगळाच प्रकारचं आनंद झाला असल्याचे दिसून आले.तसेच बोरत्याखेडा या गावात नागरिक तर्फे एक वेळाच प्रकारची उत्सुकता पाहायला मिळाली.या वेळी स्व संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट चे अध्यक्ष मनोज कटारिया, जगदंब पब्लिक स्कुल चे सस्थापक अध्यक्ष विनोद कोरडे,मित्र मध्ये उदय देशमुख,राजेश टेम्बले, मनिष एकलारे,विनोद बंड, सतीश गुजरकर,मदन भाटे,मनीष भट्ट,राजाभाऊ ठाकरे,राजेश लेंडे, निलेश कडू,संतोष पोहकार,योगेश कविटकर,प्रतीक काळे,अवी पोहकार परिवार उपस्थित होते.

दुर्गम भागातील जनतेला सुद्धा दिवाळी हा सण आपल्या प्रमाणे साजरा करता यावा हा या उपक्रम च्या मागील उद्देश असून, या मध्ये आम्हाला चांदुर बाजार मधील नागरिकांचे,विद्यार्थी,पालक तसेच आमचे मित्र परिवार याचे सहकार्य लाभले.त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.

श्री विनोद कोरडे.जगदंब पब्लिक स्कुल संस्थापक अध्यक्ष

**********************************
समाजाप्रती आपले काही देणे लागत हीच एक मनोकामना घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला.आनंद या गोष्टीचा आहे की दिवसेंदिवस या उपक्रमाला चागला प्रतिसाद चांदुर बाजार येथील नागरिक देत आहे आणि आम्हला या उपक्रम मध्ये मदत करत आहे. :- मनोज कटारिया

स्व.संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट चांदुर बाजार