साद फौंडेशनने दिला सदा महाराजांना मदतीचा हात गाईंच्या व त्यांच्या निवाऱ्यासाठी दिले एक लाख रुपये

0
795
Google search engine
Google search engine

.सांगली न्युज:सांगली जिल्ह्यातील वांगी ता.कडेगाव येथे हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्यादेशी गाईंना भिक्षा रूपाने चारा गोळा करून तो चारा गाईंना घालणाऱ्या सदा महाराजांना साद फौंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.सतीश कदम यांनी एक लाख रुपये मदत दिली असुनगाईंना व महाराजांना निवारा करून देण्याची जबाबदारी घेतली आहे.वांगीत सदाशिव कोळी नावचे साठ वर्षांचे महाराज गेली दहा ते बारा वर्ष झाली देशी गाईंना सांभाळण्याचे काम करतात गेली कित्येक वर्ष झाली ते झोपडीत राहतात.त्या झोपडी भोवती उंच गवत व विंचू , साप यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असतो.अशा कित्येक संकटांना तोंड देत महाराजांनी दहा गाईचे संगोपन केले आहे .त्यांना रहायला घर नाही ऊन , वारा, पाऊस याची पर्वा न करता कोणच्याही मदती शिवाय त्यांनी गाईचे संगोपन केले आहे .मात्र वयाच्या साठाव्या वर्षी त्यांना रहायला घर नव्हते याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नव्हते की कोणी मदतिचा हात पण देत नाही.या कलियुगाच्या जमान्यात स्वार्थी , मतलबी दुनयेत सदा महाराजांनी निस्वार्थीपणे गाईना सांभाळण्याचे काम केले आहे .सदा महाराजांचे वेगवेगळ्या स्थरातुन कोण नावजत असत तर कोण त्यांची कुचेष्टा व खिल्ली उडवत . मात्र मदतिचा हात कोणीच पुढं करत नव्हतं मात्र साद फौंडेशन ने त्यांच्या असणाऱ्या उल्लेखनीय कामाची दखल घेतली असुन त्यांना एक लाख रुपयची मदत केली आहे .