एफ आर पी प्रमाणे पैशे शेतकर्यांना द्या अन्यथा आंदोलन करू ; किरण साठे

0
657

मागील हंगामातील ऊस उत्पादक शेतकरी यांचे पैसे द्या अन्यथा आंदोलन करु – किरण साठेसोलापूर प्रतिनिधी : रजनी साळवे

मागील हंगामातील एफ आर पी प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम दिलेली नाही,अशा माळशिरस तालुक्यातील साखर कारखान्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहे,असे किरण साठे यांनी सांगितले, ज्या साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी मालक असतात मात्र त्यांना एफ आर पी ची रक्कम देणे बंधनकारक असते मात्र हे साखर सम्राट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरून या प्रकारची अडवणूक करताना दिसत आहेत,खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने सहभागी होऊन पाठिंबा देण्यात येत आहे,असे बहुजन ब्रिगेड अध्यक्ष किरण साठे यांनी म्हटले आहे, माळशिरस तालुक्यातील ज्या कारखान्याने एफ आर पी ची रक्कम दिली नाही त्या कारखान्याला आम्ही संघटनेच्या वतीने निवेदन देऊन आंदोलन छेडणार आहे व या आंदोलनामध्ये ऊस उत्पादक शेतकरी सहभागी होणे गरजेचे आहे,त्याशिवाय ह्या आंदोलनाला धार निर्माण होणार नाही असेही बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी सांगितले,माळशिरस तालुक्यातील साखर कारखाण्याच्या चेअरमन असणाऱ्या लोकांनी लवकरात लवकर मागील हंगामातील रक्कम ऊस उत्पादक शेतकरी यांच्या खात्यावरती जमा करावी अन्यथा चेअरमन यांच्या गाड्या अडवून त्याना जाब विचारण्यात येईल असा इशारा किरण साठे यांनी दिला आहे,