मनसेच्या जिल्हाअध्यक्षा वैशालीताईचा भाजप सेनेसह राष्ट्रवादी व काँग्रेसवरही हल्लाबोल ; ढोकिचा कारखाना भावा-भावानी गिळल्याचा आरोप

0
1634

मनसेच्या जिल्हाअध्यक्षा वैशालीताईचा भाजप सेनेसह राष्ट्रवादी व काँग्रेसवरही हल्लाबोल ; ढोकिचा कारखाना भावा-भावानी गिळल्याचा आरोप

पाणिटंचाईसाठी इंदापूरकरांचा नरसिंह साखर कारखान्याजवळ महामार्गावर रारास्तारोको

उस्मानाबाद -उस्मानाबाद जिल्ह्यांतल्यातील वाशी तालुक्यातील इंदापूर येथे रास्तारोको आंदोलन सुरू होते या आंदोलनात मनसेच्या जिल्हाअध्यक्षा वैशालीताईनी सरकारवर व भाजप सेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला व ढोकी कारखाना भावाभावांनी गिळला असा आरोप करत हल्लाबोल केला व इंदापूर गावाला डिवायडर नाही केला तर मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करू असा ईशारा दिला हे आंदोलन महिलांसह ग्रामस्थांनी महामार्गावर क्रमांक ५५ वर रास्तारोको केले आंदोलनाच्या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी मंडळ अधिकारी आले होते त्यांना नकार देण्यात आला आंदोलनाच्या ठिकाणी तहसिलदार आले तरच आंदोलन मागे घेऊ असा ईशारा दिला बराच वेळ तणाव निर्माण झाला होताइंदापूर गावाला गेल्या आठ दहा वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे त्यामुळे ता १५/११/२०१८ रोजी वैतागून इंदापूरकरांचा पवित्रा आक्रमक होऊन रास्तारोको करण्यात आला इंदापूरकरांच्या प्रमुख मागण्या १) इंदापूरसाठी नांदगाव साठवण तलावातून पाणिपूरवठा करावा २) इंदापूर पाटिवर गावात येण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर डिव्हाईडर करण्यात यावा ३) शिवशक्ती शे स साखर कारखाना वाशी व एस पी शुगर तडवळा यांचा २०१७/१८ गाळप हांगामात एफ आर पी नुसार भाव मिळावा ४) विद्युत पुरवठा सुरळीत मिळावा ५) इंदापूर येथे सिमेंट बंधारे बांधण्यात यावेत ६) चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात ६) नरसिंह साखर कारखाना चालू करण्यात यावा या सहा प्रमुख मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी मनसेचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र गपाट ,मनसेच्या महिला आघाडिच्या जिल्हाअध्यक्षा वैशालीताई ,परंडा येथील सुरेश पाटिल ,दत्ता बोंदर ,संतोष बारकुल ,रोहिदास मारकड, वसंत बारकुल ,रामभाऊ घोडके , पांडुरंग सुतार , पांडूरंग घोंगडे , अमोल कदम ‘योगेश उंदरे जेष्ठ सामाजीक कार्यकरते बळीराम (बापू) चेडे , सरपंच सौ लक्ष्मी शिंदे ,ग्रा प सदस्य बालाजी उकंडे यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य व शेतकरी ग्रामस्थ व मनसेचे कार्यकरते मोठ्या संख्येने उपस्थीत होते आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी वाशीचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण ,सहाय्यक पोलिस निरीक्षक चोरगे यांच्यासह पंचेविस पोलिसांचा फौजफाटा बंदोस्तासाठी तैनात करण्यात आला होता