प्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान

0
1216
Google search engine
Google search engine

आकोट/ संतोष विणके

येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील 5 विद्यार्थिनींनी प्रतिकुल परीस्तिथीवर मात करत उन्हाळी 2018 परीक्षेतील मेरिट यादी मध्ये स्थान मिळवले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील जवळपास 25 हजार विद्यार्थ्यांनी बीकॉम थर्ड इयरची परीक्षा दिली होती.त्यामधून 10 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रकाशित झाली असुन त्यात महाविद्यालयाच्या 5 विद्यार्थिनींनी मेरिट लिस्ट मध्ये स्थान पटकावल्यामुळे महाविद्यालयाने मेरीट परंपरा कायम राखली आहे.

कु. समीक्षा श्रीकृष्णराव नाथे या विद्यार्थिनीने 82.06% प्राप्त करून प्रथम येण्याचा मान मिळवला तर कु. प्रतीक्षा अशोक भावे तिसरी मेरीट कु.सरला उत्तमराव हीवरे चौथी मेरिट कु.कौमुदी दिपक देव सहावी मेरीट,कु.रोहीणी गोविंद पिंपळे सातवा क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नाव लौकीक वाढवला. यातील बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातील आणि सामान्य कुटुंबातील असून त्यांनी मिळवलेल्या उत्तुंग यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे, प्रथम मेरिट कुमारी समीक्षा नाथे ही डेटा अॉपरेटरचे काम करून व मेहंदीचे क्लासेस करुन आपले शिक्षण पूर्ण केले तिला उपजिल्हाधिकारी व्हायचे आहे .कुमारी प्रतिक्षा हीला प्राध्यापक व्हायचे आहे.कु.सरला हीवरे हीने सुरुवातीला शेतमजुरी करुन शिक्षण पूर्ण केले आहे. तिला प्रथम श्रेणी अधिकारी व्हायचे आहे. कु. रोहीणी पिंपळे शिलाई काम करून आपले शिक्षण पूर्ण केले आहे तिला विक्रीकर अधिकारी व्हायचे आहे.कु.कौमुदी देव ही आय सी डब्लु ए करीत असून तिला नामांकित कंपनीमध्ये कॉस्ट अकाउंटंट व्हायचे आहे.

यासर्व विद्यार्थिनींचा महाविद्यालयामध्ये सत्कार घेण्यात आला.या प्रसंगी प्राचार्य डॉ.अंबादास कुलट यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे अधिक्षक भालचंद्र फोकमारे डॉ. संजय वाघ,डॉ. संजय कोल्हे अविनाश पवार व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ.कुलट वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनिल पांडे, अविनाश पवार महाविद्यालय शिक्षक वृंद आणि आई-वडील यांना दिले आहे.संस्थेचे अध्यक्ष मा.हर्षल देशमुख उपाध्यक्ष गजानन पुंडकर कार्यकारणी सदस्य मेतकर यांनी सुध्दा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.