उपहारगृह व स्वच्छतेसाठी ‘शताक्षी’ च्या ताब्यात आल्यापासून मिळाली चकाकी

0
756
Google search engine
Google search engine

शेगांव: –  सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील शासकीय विश्राम भवन व विश्रामगृहाचे स्वछतेसोबतच उपहारगृह चालवण्यासाठी काही दिवसांपूर्वी ‘शताक्षी इंटरप्रायजेस ‘ या कंत्राटदार कंपनीची नियुक्ती केली आहे.सदर इंटरप्रायजेसने 17 ऑक्टोबर पासून येथील कार्यभार स्वीकारला आहे.सा बा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील थोटांगे, शेगांव विकास आराखडा अंतर्गत नियुक्त असलेले उपकार्यकरी अभियंता तायडे,शेगाव शाखा अभियंता किशोरकुमार मिश्रा यांचे मार्गदर्शनात या कंपनीचे 30 कामगार या ठिकाणची नियमितपणे स्वच्छता करीत असून येथे येणारे केंद्र तसेच राज्य मंत्री, विविध राजकीय पक्षाचे प्रमुख नेते,व्ही.आय.पी पाहुणे तसेच निवासी अधिकारी यांना उपहारगृह द्वारे  चांगली सेवा पुरवत आहेत.यामुळे विश्राम भवन व विश्रामगृह परिसराने कात टाकलेली दिसून येते.इमारती मधील स्वछतेसोबतच कंपनीचे कामगार विश्रामगृहाचा भव्य परिसर दररोज सकाळी दुपार संध्याकाळ झाडून स्वच्छ करतांना दिसतात.पूर्वी अशाप्रकारे स्वच्छता दिसत नव्हती.येथील फुलझाडं व अन्य वृक्षांना नियमित पाणी दिल्या जात आहे.तिन्ही इमारतीची रंग रंगोटी करून जुन्या इमारतीला विश्राम भवन ,विकास आराखड्यांतर्गत बांधण्यात आले नवीन इमारत पैकी एका इमारतीला विश्राम गृह (विकास) तर दुसऱ्या इमारतीला विश्राम गृह विसावा, असे वेगवेगळे नामकरण करण्यात आले आहे.व्हीआयपी साठी जुन्या व नवीन इमारत उपहारगृह आहे.याठिकाणी ऑर्डर प्रमाणे चहा नाश्ता, जेवण  तयार करून देण्यात येते व त्याला वाजवी दरानुसार बिल आकारण्यात येते.एकंदरीत  या शासकीय विश्रामगृहाला  ‘शताक्षी इंटरप्रायजेस ‘ च्या कंत्राटमुळे चांगली चकाकी मिळाली आहे.