*देशातील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची असेल तर या देशात राजकीय इच्छा शक्ती व प्रामाणिक प्रयत्न असायला हवे :- श्री.मनीष सिसोदिया –दिल्ली सरकार उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री*

232
जाहिरात

महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांच्या आयोजित राज्य स्तरीय परिषदेत आप सरकारचे शिक्षण मंत्री बोलत होते . दिल्लीसरकाच्या शालेय शिक्षणात जे अमुलाग्र परिवर्तन होत आहे त्याची दखल संयुक्तराष्ट्र संघाने देखील घेतली आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोप-यातून याबाबत कुतुहूल निर्माण झाल्यानेआज राज्यातील हजारो मुख्याध्यापक तेथे जमले होते .या सर्व मुख्याध्यापकांना संबोधित करताना ते पुढेम्हणाले , मुख्याध्यापक शिक्षक सर्व राजकीय प्रश्नसोडून आज शिक्षणाच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी एकत्र येत आहेत हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेने उचललेले एक स्वप्नवत पाऊल आहे. शिक्षण मंत्री म्हणून गेल्या साडेतीन वर्षांपासून मी कामकरत आहे. या कालावधीतील माझा अनुभव एकावाक्यात सांगता येईल तो म्हणजे, “देशातीलशिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची असेल तर यादेशात राजकीय इच्छा शक्ती व प्रामाणिक प्रयत्नअसायला हवे.”आज दिल्लीत पालक आपल्यामुलांना खासगी शाळांतून काढून सरकारी शाळेतदाखल करत आहेत.नवीन सरकारी शाळा सुरु केली कि दिल्ली शिक्षणप्रशासनावर प्रचंड ताण येत आहेत,कारण त्यापरिसरातील लोक आपल्या मुलांना मोठ्या संख्येनेसरकारी शाळेत दाखल करत आहेत.त्यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करतानापुढील बाबी अधोरेखित केल्या .शिक्षणाला आपणआजपर्यंत कधी गंभीरतेने घेतले गेले नाही.आज देशात शिक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालय देखीलनाहीये, शिक्षण विभाग हा मनुष्यबळ विकासमंत्रालयाच्या अंतर्गत येतो.विद्यार्थ्यांना वैज्ञानिक तसेच मूलभूत मानवताशिकविणारे शिक्षण न देता त्यांना मनुष्यबळम्हणून वागविले जाते.त्यामुळे आज आपली संपूर्ण समाज व्यवस्थागोंधळलेल्या अवस्थेत आहे. आपल्या मुलांनाफक्त इंजिनियर, डॉक्टर बनविणे, नोकरी देणेया व्यतिरिक्त काहीही शिकविल्या जात नाही.शाळेत शिकणे शिकविणे होत नाही ,कारणशाळाबाह्य कामात शिक्षकांना गुंतवून ठेवले जाते .दिल्लीमधील शिक्षकांसोबत मनीष शिसोदियाव्हाट्सअँप वर थेट उपलब्ध असतात. शाळाप्रशासनाकडून कडून त्यांच्या समस्या समजावूनघेतल्या आणि दिल्लीतील १००% शाळा उच्च दर्जाच्यासुविधांसह सुसज्ज केल्या. आज अमेरिका, फ्रांस,जर्मनी हे देश पुढे आहेत कारण त्यांनीशिक्षणावर भर दिला, सर्वांना चांगल्या दर्जाचे आणिसमान शिक्षण दिले.जनता व शिक्षक यांना कसे सोबत घेतलेयासंदर्भात त्यांनी पुढे नमूद केले कि ,दिल्लीतील हे परिवर्तन कश्यामुळे शक्यझाले तर ,आम्ही शिक्षकांसोबत नव्यानेसंवाद सुरु केला त्यांच्या स्वताच्या नवीनकल्पनांना आम्ही चालना दिली . शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण हक्ककायद्यांतर्गत आहे तिचा पुरेपूर वापर केला .राज्यसरकारच्या निधीचा २५ टक्के पैसासरकारी शिक्षण व्यवस्थेवर खर्च केला .शाळा मुख्याध्यापक यांच्यावर जाणीवपूर्वकविश्वास टाकला. त्यांनी गरीब पालकांच्या समस्यासमजावून घेण्याचा प्रयत्न केला.शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यावी करितावातावरण निर्माण केले.यासाठी साधन, प्रशिक्षणआणि स्वातंत्र्य दिले . जेणेकरून शिक्षक विद्यार्थी नाते तयार झाले . राज्य घटनेने दिलेला शिक्षणाचा मुलभूत अधिकार प्रत्यक्षात कसा दिला जाईल हेडोळ्यात तेल घालून आप सरकार लक्षदेवून आहे . आमचे मुख्याध्यापक शिक्षक आणि पालकविद्यार्थी संयुक्तपणे हे काम पुढे नेत आहेत हेसगळीकडे होवू शकते. ‘नियत प्रामाणिक असेल तर,हे शक्य होते हा आमचा अनुभव आहे.’या कार्यक्रमात आप महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियरसुधीर सावंत उपाध्यक्ष रंगा राचुरे आणि राज्यआप सचिव सुभाष तंवर आणि हजारोमुख्याध्यापक उपस्थित होते .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।