स्व.मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मुती दिना निम्मीत्त आदिवासी महिलाना ब्लॅंकेट वाटप..!

0
1292
Google search engine
Google search engine

अकोट/प्रतिनिधी

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृति दिनाचे औचित्य साधून स्थानिक शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ग्राम वस्तापूर येथील गरजु आदिवासी महिलाना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.या ब्लेंकेट वाटपातुन शिवसैनिकांनी गरजुंना मायेची ऊब दिली शिवसैनिकांना,80%समाजकारण व केवळ 20%राजकारणाची शिकवण मा.बाळासाहेबा नी दिली तोच वसा जपत महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्रा.माया म्हैसने यांनी ग्राम वस्तापुर येथे आदिवासी महिलाना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्याअध्यक्ष
वस्तापूर मा.सरपंच श्री संजयसिंग गयधर होते तर प्रमुख वक्त्या म्हणून प्रा मायाताई म्हैसने,जिल्हा संघटिका, महिला आघाडी, प्रमुख पाहुणे म्हणून मा.प स. सदस्य सौ.जयश्री गयधर ,सौ उषा गिरणाले,आकोट ता.संघटिका, श्रीमती विध्या डोबाले, शाखा संघटिका,श्री,राधेश्याम जमुनकार,ग्राम पंचायत सदस्य, यांची प्रमुख उपस्थिती होती. गोरगरिबांना मदत हीच खरी बाळासाहेबाना आदरांजली!अश्या शब्दांत सौ मायाताईंनी आपली आदरांजली वाहिली तर बाळासाहेबाची शिकवण नुसार आचरण हीच बाळासाहेबना खरी श्रद्धांजली असे शब्दात आपले मनोगत व्यक्त केले सरपंच श्री संजय सिंग गयधर यांनी सांगितले. त्यानंतर भगिनींना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले, कार्यक्रमचे संचालन अंगणवाडी सेविका सौ.शालू पटके, यांनी तर आभारप्रदर्शन हर्षल गव्हाळे यांनी केले, कार्यक्रमाला हेमराज तोटे,बजरंग गवते,,अंकित जयस्वाल,चंपालाल ढिगार,श्रीकृष्ण बेलसरे, सौ बेबी धांडेकर, बबिता आगरकर, मीरा कासडे,अनिता खोटे,सुशील गवते,वत्सला बेलसरे,,सुशीला गवते, राजकन्या कासडे रेणुका बेलसरे,बिजा ढिगर इ .अनेक महिलांची उपस्थिती होती.