उस्मानाबादच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

0
1291
Google search engine
Google search engine

उस्मानाबादच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

उस्मानाबाद – /प्रतिनीधी

उस्मानाबाद – त्रिपुरा राज्याच्या विद्युत विभागाची जबाबदारी डॉ. मुरहरी केळे यांच्या खांद्यावर
उस्मानाबाद, दि. 18- सातत्यपूर्ण कामगिरी, प्रचंड तळमळ आणि सामान्य नागरिकांच्या कामाला प्राधान्य देण्याची भूमिका यामुळे उस्मानाबादचे भूमिपुत्र असलेले डॉ. मुरहरी केळे यांचा त्रिपुरा राज्य सरकारने सन्मान केला आहे. जिल्ह्यातील केळेवाडी येथील सुपूत्र डॉ. मुरहरी केळे यांची त्रिपुरा राज्य सरकारने वीज वितरण, पारेषण आणि निर्मिती या तिन्ही आस्थापनांच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड केली आहे. त्यामुळे उस्मानाबादच्या शिरपेचात डॉ. केळे यांंच्या रूपाने आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मध्यप्रदेश राज्याच्या विद्युत विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांंच्या कामाचे देशभरातील विद्युत क्षेत्रात कौतूक होत आहे. डॉ. केळे यांनी विद्युत क्षेत्राबरोबर वारकरी सांप्रदाय, साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. डॉ. केळे यांचा विद्युत क्षेत्रातील देशातील सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मान झालेला आहे. त्यांच्या साहित्यकृतीला विविध साहित्य संस्था व मंडळांकडून पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. तसेच प्रशासकीय कामाबद्दलही त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
डॉ. केळे यांनी यापूर्वी मध्यप्रदेश वीज वितरण कंपनीत तीन वर्षे संचालक पदावर यशस्वीरित्या चांगले काम केलेले आहे. त्यांच्या कामाची दखल घेत त्रिपुरा राज्य सरकारने वीज वितरण, पारेषण आणि निर्मिती या तिन्ही आस्थापनांच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव बापू जगदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय सूळ, बालाजी आगवाने आदींनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.