अकोट ग्रामीण पोलिसांनी सोडवला दुर्मिळ मांडुळ जातीचा साप,वनविभाग मात्र झोपेत ?

995
जाहिरात

अकोट/प्रतिनिधी

अकोट ग्रामीण पोलिसांनी दुर्मिळ मांडुळ जातीच्या सापाला तस्करांच्या तावडीतुन सोडवुन जीवनदान दीले.अकोट पोपटखेड मार्गावर सोमवारी दि.१९ नोव्हे.ला सकाळी डीबी पथक गस्त घालीत असतांना एक युवक पोलिसांना बघून पळू लागला. तो का पळाला याची शहानिशा करणे कामी डीबी पथकाने त्याठिकाणीं जाऊन पाहिले असता तेथे एक पिशवी मिळाली त्यामध्ये बघितले असता यामध्ये एक साप दिसून आला. याबाबत ठाणेदार मिलिंदकुमार बहाकर याना माहिती मिळाल्याने त्यांनी अकोट वन्यजीव विभागाला कळविले.यावेळी सुमारे ६ फूट लांब असलेल्या सापाला बघण्याकरिता एकच गर्दी झाली होती.दरम्यान यावेळी ठाणेदार बहाकर यांनी सर्प मित्र मंगेश गंगातीरे यांना सुद्धा बोलावून घेतले होते. सर्प मित्र गंगातिरे यांनी हा साप मांडूळ जातीचा असल्याचे सांगून या सापाची धनप्राप्ती, अंधश्रद्धा अघोरी विद्या या करिता काहीजण वापर करतात असे सांगितले.

पोलिसांनी सापाला वनविभागाकडे दिले.ग्रामीण पोलिसांच्या चोख कर्तव्यामुळे एका सापाला जीवदान मिळाले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.दरम्यान याबाबत वन विभागाने काय कारवाई केली हे वृत्त लिहेस्तोवर कळु शकले नाही. ही कामगिरी ठाणेदार मिलिंदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नारायण वाडेकर, विकास गोलाकार, गजानन भगत,अनिल सिरसाट प्रवीण गवळी यांनी केली.

जाहिरात