*आमदार डॉ अनिल बोंडे यांच्या पाठपुराव्याला यश- कृषी पंपाच्या वेळेत झाला बदल १ डिसेंबर पासून होणार लागू*

0
1281
Google search engine
Google search engine

सध्यस्थितीत वरुड मोर्शी तालुक्यामध्ये कृषी पंपाचा विद्युत पुरवठा रात्री १०.५५ ते सकाळी ६.५५ वाजेपर्यंत व दिवसा सकाळी ७.१५ ते दुपारी ३.१५ पर्यंत करण्यात आलेला आहे. यावेळी मोर्शी वरुड तालुक्यातील शेतक-यांनी आमदार डॉ अनिल बोंडे यांच्याकडे कृषी पंपाच्या वेळेत बदल करण्यात यावी अशी मागणी केली होती या मागणीला अनुसरून आमदार डॉ अनिल बोंडे यांनी राज्याचे उर्जामंत्री मा.ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांना विनंती केली होती. त्यानुसार वरुड मोर्शी तालुक्यातील कृषी पंपाचा रात्रीचा विद्युत पुरवठा रात्री १.३० ते सकाळी ९.३० व दिवसाचा ९.३५ ते दुपारी ५.३० पर्यंत या शेड्युलमध्ये करण्यात येणार आहे. यावेळी मोर्शी वरुड तालुक्यातील शेतक-यांनी आमदार डॉ अनिलजी बोंडे यांचे आभार मानले आहे.