कल्याण येथे धर्मांधांकडून होणारे धार्मिक पुस्तकांचे वाटप हिंदुत्वनिष्ठांनी रोखले !

0
898
Google search engine
Google search engine

कल्याण – येथील पश्‍चिमेतील मुख्य बाजारपेठ परिसरात २० नोव्हेंबरला धर्मांधांकडून चालू असलेले एका धार्मिक पुस्तकाचे वाटप हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने प्रखर विरोध करत रोखले.

१. कल्याण पश्‍चिम येथील स्थानक परिसरात एका हिंदुत्वनिष्ठाने एका बंद असलेल्या आस्थापनाच्या बाहेर पदपथावर धर्मांध काहीतरी वाटत असल्याचे पाहिले.

२. ते स्वतः तेथे गेले असता धर्मांध त्यांच्या धर्मातील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांतील धार्मिक पुस्तके येणार्‍या जाणार्‍या बहुसंख्य हिंदूंना वाटत असल्याचे त्यांना दिसले.

३. हिंदुत्वनिष्ठाने त्वरित त्यांच्या परिचयातील इतर हिंदुत्वनिष्ठांना संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

४. त्यानंतर सर्व हिंदुत्वनिष्ठांनी कल्याण पोलीस नियंत्रण कक्षेत संपर्क साधत संबंधित धार्मिक पुस्तक वाटपाचा निषेध नोंदवला.

५. हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने केलेल्या प्रखर विरोधामुळे पोलिसांनी त्वरित कारवाई करत या पुस्तकाचे वाटप केवळ एक घंट्यात बंद केले.

६. धर्माधांकडे कोणत्याही प्रकारची अनुमती नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

७. विविध भाषांतील अनुमाने २ सहस्र पुस्तकांच्या प्रती तेथे असल्याचे एका धर्मांधांने सांगितले.