(म्हणे) ‘महाआरतीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास कारवाई करणार !’ – पोलीस निरीक्षक

0
924
Google search engine
Google search engine

 

नवी मुंबई – महाआरतीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास कारवाई करणार असल्याची नोटीस सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पाडवी यांनी येथील रहिवाशांना बजावली आहे. सिडकोने अल्पसंख्यांक मुसलमान वस्तीत हिंदूंचा प्रचंड विरोध असूनही मशिदीसाठी भूखंड दिला आहे. त्याविरोधात स्थानिक हिंदू एकत्र येऊन महाआरती करत आहेत.

यापुढे जाऊन पोलीस आयुक्तांनी १७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत जमावबंदी लागू केली असल्याचे या नोटिसीमध्ये म्हटले आहे. त्यानंतर जमावबंदीचा उल्लेख या नोटिसीमध्ये नाही, तरही त्यांनी कलम १४९ नुसार ही नोटीस बजावत असल्याचे म्हटले आहे.

या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, सानपाडा रहिवाशी महासंघाकडून महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक रस्ता अडूून कायदा आणि सुव्यवस्थेत बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही नोटीस पुरावा म्हणून तुम्ही आणि तुमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी यांच्या विरुद्ध न्यायालयात सादर करण्यात येईल. त्यामुळे तुम्ही वरील प्रकारच्या कृत्यापासून स्वतःला आणि इतरांना परावृत्त करावे.

महाआरतीमुळे नव्हे, तर मशिदीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे ! – सानपाडा रहिवासी महासंघ

या नोटिसीविषयी सानपाडा रहिवासी महासंघाचे पदाधिकारी घनश्याम पाटे म्हणाले, ‘‘महाआरतीमुळे नव्हे, तर मशिदीमुळे कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होत आहे. जमावबंदी नसतांनाही त्याचा नोटिसीमध्ये उल्लेख करून रहिवाशांवर दबाव आणण्याचा पोलिसांनी प्रयत्न करू नये. मुसलमान नमाज पढत असतांना रस्ता अडवला जातो, तेव्हा पोलिसांनी अशा नोटिसा दिल्याचे ऐकिवात नाही. यावरून पोलिसांचे नाहक दबावतंत्र चालू आहे.’’