वान धरणाच्या कालव्यात पडुन बिबट्याचा मृत्यू

0
1287
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतीनिधी

मानव आणि जंगली प्राण्यांच्या संघर्षाने वातावरण तापले असताना काल दि,21 नोव्हे. ला वान धरणाच्या कॅनॉलमध्ये बिबट मृतावस्थेत दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. धरणाच्या कालव्यामध्ये बिबट मृतावस्थेत असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यांनी ही बाब वन विभागाला कळवले असता वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी बिबट्या मृतावस्थेत असल्याचे वन अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. मृत बिबट्याचे जागेवरच तज्ञांच्या वतीने शव विच्छेदन करण्यात आले त्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेने वान धरण परिसरासह आजूबाजूच्या गावांमध्ये जंगली प्राण्यांचा मुक्त संचार असल्याचे परत एकदा अधोरेखित झाले आहे,मात्र बिबट्याच्या मृत्यूने निसर्ग पर्यावरण तथा वन्यजीव विषयक कार्य करणाऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.