वाडा: विविध गुन्ह्यांतील १० आरोपींना मुद्देमालासह अटक

0
660
Google search engine
Google search engine

वाडा: विविध गुन्ह्यांतील १० आरोपींना मुद्देमालासह अटक

वाडा/प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत तालुक्यात झालेल्या मोटारसायकल चोरी, घरफोडी, फसवणूकीच्या अशा विविध गुन्ह्यांमध्ये थेट सहभागी असलेल्या एकूण १० आरोपींना वाडा पोलिसांनी धडक कारवाई करून मुद्देमालासह अटक केली आहे.
तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून अज्ञात चोरट्यांनी वाहनचोऱ्या, घरफोड्या करून संपूर्ण तालुक्यात उच्छाद मांडला होता. या सर्व घटनांमुळे वाडा पोलिसांसमोर या चोरट्यांचे आव्हान उभे राहिले होते. या चोऱ्यांची उकल करण्यासाठी वाडा पोलिसांनी विविध ठिकाणी पथके पाठवुन व सापळा रचून मोठ्या शिताफीने मुख्य आरोपी सोहिल (वय-३७) याच्यासह इतर ९ आरोपीना पोलिसांनी जेरबंद केले या चोऱ्यांमध्ये तालुक्यातील नेहाळपाडा येथील मंदिरातील दानपेटीची चोरी व गांधरे गावातील घरफोडीचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे .सदर आरोपीवर वाडा पोलिस स्टेशनमध्ये भादंविसं ३७९ कलमानुसार वाडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस अधीक्षक गौरव सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी हे आव्हान स्विकारत या गुन्ह्यातील १० आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले.
या गुन्हेगारांकडून ८ मोटारसायकल, लॅपटॉप, घरफोडीमधील चोरीस गेलेली रोख रक्कम, व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.