शेतकरी मोटर्सचे नंदकिशोर शेगोकार विदेश अभ्यास दौऱ्यावर

0
1283

अकोट/प्रतीनीधी

स्थानिक शेतकरी मोटर्सचे संचालक नंदकिशोर शेगोकार हे थायलंड येथे आठ दिवस अभ्यास दौऱ्यावर जात आहेत. स्टीलबर्ड कंपनीच्या वतीने या विशेष विदेश अभ्यास दौऱ्यासाठी त्यांची विदर्भातून निवड झाली आहे. थायलंड येथे होणाऱ्या या अभ्यास दौऱ्यासाठी दिनांक 23 नोव्हेंबरला मुंबई येथून प्रस्थान करणार आहेत. या दौऱ्यात ते दुचाकी वाहतूक बाबींबाबत सादर होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत तसेच रस्ता सुरक्षा विषयक खबरदारी व वाहतुक नियम बाबतही यावेळी आतंरराष्ट्रीय कार्यशाळा होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. शेवटी अभ्यास दौऱ्यातील उल्लेखनीय बाब म्हणून आंतरराष्ट्रीय अवार्ड सेरेमनी देखील होणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.अकोट सारख्या शहरातून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होणाऱ्या या दौऱ्यानिमित्य त्यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.ते संस्कृती संवर्धन समिती ,संस्कार भारती जेसिआय यासह इतर अनेक संस्था संघटनांचे पदाधीकारी आहेत.