आकोटात दुष्काळ मदतीच्या प्रयत्नां ऐवजी बदलीचा खेळ

1205

ठाणेदार शेळकेंच्या बदलीने जनतेत नाराजी

अकोट/ प्रतीनिधी

संवेदनशीलतेचा डाग असणारे अकोट शहर हे गेल्या काही वर्षांपासून शांत आहे, मात्र हे जरी सत्य असले तरी आकोट कायम चर्चेत असते यावेळी अकोट चर्चेत आहे ते चांगल्या अधिकाऱ्याच्या बदलीमुळं व दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर टाकणाऱ्या महर्षींच्या भूमिकेमुळं.अकोट तालुका हा दुष्काळी झळा सहन करत असताना अकोटचे महर्षी मात्र भुमिपुजनांमध्ये व्यस्त आहेत. तर चांगल्या अधिकाऱ्यांच्या बदलीने जनतेत नाराजीचा सुर आहे. संवेदनशीलतेच्या डागासाठी सुप्रसिद्ध असलेल्या अकोटातील सामान्य जनता एका प्रामाणिक कर्तव्यशील लोकप्रिय ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीने हवालदिल झाली आहे.

१४ महीन्यांपेक्षा कमी कालावधीत संवेदनशीलतेचा डाग असलेले अकोट शहर हे आपल्या प्रभावी पोलिसिंगने शांत ठेवणाऱ्या शहर ठाणेदार गजानन शेळके यांच्या बदलीमुळे आकोटात सामान्य जनांमधुन तिव्र नाराजीच्या भावना व्यक्त होत आहेत. त्याला कारण म्हणजे ठाणेदार शेळके यांनी अल्पावधीतच आपल्या प्रभावी पद्धतीने राबवलेली कायदा-सुव्यवस्था शांततेत पार पडलेले सण-उत्सव मिरवणुका व विशेष म्हणजे शांततेत झालेली धार्मिक स्थळांची निष्कासन मोहिमेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. यासोबतच त्यांनी सातत्याने राबवलेले सोशल पोलिसींगने शहरवासियांची मने जिंकली. विशेष म्हणजे त्यांनी निराधार वृद्ध महीलेला दिलेला आधार ज्येष्ठ नागरिकांचे केलेले सांत्वन, गरीब रिक्षाचालकांची केलेली मदत ही खरी लोकसेवा केल्याने ते सामान्य जनतेत लोकप्रिय ठरले. सामान्य जनांच्या प्रेमाचा लोकमान्यतेचा हा विश्वास राजकीय व्यवस्थेला पचनी न पडल्याने ठाणेदार शेळके यांची बदली केल्या गेल्याची भावना अकोटवासीयां मध्ये आहे. त्यामुळे येणार येणार म्हणून वाट पाहणाऱ्या अकोट वासियांना अच्छे दिन खरंच केव्हा येतील हा प्रश्न आता सतावतोय. अकोटातील नकारात्मक वातावरणामुळे कुठलाही अधिकारी यायला धजावत नाही अशी अकोट बाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा असते. अशातच प्रामाणिक अधिकाऱ्याचा होणारा अभिमन्यु हा सामान्य जनतेमध्ये आता चर्चेचा विषय ठरतो आहे.

जाहिरात