उस्मानाबाद – सांजा रसत्यावर येड्या बाभळीचा कब्जा ; नगर परिषदेचे दुर्लक्ष

0
784

उस्मानाबाद – उस्मानाबाद – औसा रस्ता सांजा चौकापर्यत जाणार्या रसत्याच्या दोन्ही बाजूने येड्या बाभळीने घेरले आहे उस्मानाबाद शहरातील हा रस्ता महत्वाचा आहे या रसत्यावरून शाळेला विद्यार्थी सायकलवर ये जा करतात त्यांना सायकल रसत्याच्या कडेने चालवावी लागतात मोठि वाहने आली तर त्यांना सायकल येड्या बाभळीवर घालावी लागते. त्यामुळे आत्तापर्यत बरेच येड्या बाभळीवर अपघात झाल्याचे समजते. तसेच बर्याच मोटार सायकलचेही अपघात झाले आहेत. याकडे स्थानिकच्या नेत्यांचे अक्षम्य दुर्लक्षच असल्याचे दिसत आहे. नगर परिषदेने संबंधित विभागाला कळवून या येड्या बाभळीने रसत्यावर केलेला कब्जा हटवावा अशी मागणी उस्मानाबादकरांकडून केली तर जात आहेच.पण उस्मानाबाद चे नेते पुढारी हे कशात मग्न आहेत ? त्यांना या रसत्यावरून प्रवास करताना या येड्या बाभळी दिसत नसतील का ? असे अनेक प्रश्न वाहन धारकांतून उपस्थीत केले जात आहेत.