कडेगांव पलुस तालुक्यातील राष्ट्रीयकृत बॅंकाकडुन मुद्रा कर्जा संबधी ग्राहकांना अपमानास्पद वागणूक!

0
1330
Google search engine
Google search engine

सांगली न्युज:सांगली जिल्ह्यातील कडेगांव व पलुस तालुक्यातील मुद्रा कर्जाच्या लाभापासून या दोन तालुक्यातील ग्राहक वंचीत रहात आहेत. हे ग्राहक कडेगाव व पलुस तालुक्यातील असुन आम्ही सर्व ग्राहक आमच्या व्यवसायीक कार्यक्षेत्राच्या अखत्यारित येत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत मुद्रा कर्ज मागणीसाठी गेलो असता तेथे आम्हास कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही असे निवेदन दि.१४/११/२०१८ रोजी श्रीकांत मांडके व आरीफ आत्तार यांनी निवासी अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांचेकडे दिले.निवेदनात पुढे मांडके व आत्तार यांनी म्हटले आहे की,आम्ही पुणे स्थित मुद्रा लोन कन्सलटन्सी यांचे सहकार्य घेतले व त्यानंतर आम्हा सर्वांचे प्रस्ताव रजिस्टर पोस्टाने सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पोहोच केले.त्या सर्व प्रसतावांची पोहोच ग्राहकांच्याकडे पुराव्यासाठी उपलब्ध आहेत.आम्ही ग्राहकांनी बॅकेत पाठविलेल्या कर्ज प्रस्तावाबाबत विचारणा केली असता सदर राष्ट्रीयीकृत बँकाकडुन अपमानास्पद वागणूक मिळत आहेत व त्यासंबंधी विचारणा केली असता बॅकेत सादर केलेले कर्ज प्रस्ताव रद्द करण्याची व कायदेशीर कारवाई करण्याची भाषा केली जाते.सर्व कर्ज प्रस्तावावर नकारात्मक पध्दतीने केले जात आहे.असे आम्हा ग्राहकांना दिसत असल्याने व मुद्रा कर्जाची आम्हा सर्वांना गरज असल्याचे आम्ही त्रास सहन करीत आहोत.ग्राहकांना नको असलेली कागदपत्रे मागणे,चालु खाते काढुन त्या खात्यावर व्यवहार करणेस सक्ती करणे हा बेकायदेशीर प्रकार सर्वच बॅंकांकडून राजरोसपणे चालु आहेत त्यामुळे ग्राहक या बॅकेच्या त्रासाला कंटाळून गेली आहे.परंतु बॅंक व बॅंक प्रशासन यांना काहीही फरक पडत नाही हेच दिसून येत आहे.रिझर्व बॅंक ऑफ इंडिया ने मुद्रा कर्ज योजनेसाठी दिलेल्या कोणत्याही नियमात चालु खाते असणे व त्यावर व्यवहार असणे असा कोणताही नियम नाही.तरी संबधीत बॅंका ग्राहकांना नको असलेले नियम सांगुन ग्राहकांची दिशाभूल करीत आहेत. तरी आम्ही दोन्ही तालुक्यातील सर्व व्यवसायीकांनी मुद्रा कर्ज मागणी संदर्भात आपल्या कार्यालयास लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे परंतु आपल्या कार्यालयाकडुन कोणतीही कारवाई झाली नाही.आम्हाला आमच्या हक्काचे मुद्रा कर्ज दि.२९/११/२०१८ पर्यंत मिळाले नाही तर आम्ही निवेदनावरील सर्व ग्राहक दि.०२/१२/२०१८रोजी प्रत्येक ग्राहक दोन्ही तालुक्यातील त्यात्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेसमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत असा निर्धार केला आहे.तरी सोबत ज्या ग्राहकांचे कर्ज प्रस्ताव बॅकेत पडुन आहेत व काही ग्राहकांच्या प्रस्तावावर मुद्रा लोन कन्सलटन्सी काम करीत आहेत.ग्राहकांच्या भावनांचा आदरपुर्वक विचार करून संबंधित बॅकांना निर्देश द्यावेत व आम्हाला मुद्रा कर्ज उपलब्ध करुन द्यावे असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनावर सिमा मांडके,सिमा शिंदे,राजकुमार चौगुले,सुधाकर तुकाराम चव्हाण,शमशादरोशन आत्तार,किरण देशमुख,अजिम मुल्ला यांच्यासह कडेगांव पलुस तालुक्यातील ६०ग्राहकांच्या निवेदनावर सह्या आहेत.