आज अयोध्या येथे श्री उद्धव ठाकरे यांची सभा व विहिंपची धर्मसंसद …..तर नागपुरात साध्वी ऋतंभरा देवी यांची ‘हुंकार’ सभा

0
818

 

अयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा आणि त्यांची २५ नोव्हेंबरला होणारी सभा, तसेच विश्‍व हिंदु परिषदेची धर्मसंसद या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत तब्बल १० सहस्र पोलिसांचा प्रचंड फौजफाटा नियुक्त करण्यात आला आहे. या कार्यक्रमांसाठी सहस्रो शिवसैनिक आणि रामभक्त अयोध्येत पोहोचले आहेत. तर इकडे अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा एक प्रयत्न म्हणून विश्व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी हनुमान नगरातील ईश्वर देशमुख शारीरिक क्रीडा महाविद्यालयाच्या मैदानात हुंकार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राज्यातील ७९ पेक्षा अधिक संतांबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.