आकोटचे ग्रामदैवत श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सवास सुरवात ; दि २८ ला पालखीची नगर परिक्रमा व दहीहंडी

0
1260
Google search engine
Google search engine

आकोट/ संतोष विणके

दरवर्षी प्रमाणे आकोटचे ग्रामदैवत श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सवास कालपासुन (दि २४) भक्तीभावात व उत्साहाने सुरवात झाली आहे.यात्रे निमित्य दि.२४ ते ०५/१२/२०१८ वार बुधवार पर्यंत श्री नरसिंग महाराज मंदिरात दररोज भजन,प्रवचन, हरिपाठ, भारुड,नाम संकीर्तन ई. कार्यक्रम पार पडणार आहेत.श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सव कार्तिक वद्य !! ५ !! झाल्यानंतर म्हणजेच दि.२७ नोव्हेंबर पासुन पुढील महीनाभर ५ बुधवार व रविवार पावेतो सुरु राहील असे नरसिंग महाराज संस्थानचे अध्यक्ष सतिष आसरकर यांनी सांगीतले आहे.

यार्रा महोत्सवात काल कार्तिक वद्य !! १!! श्री तीर्थ स्थापना सकाळी ९ वाजता.करण्यात आलीअसुन
दिनांक २५/११/२०१८ कार्तिक वद्य !! ३ !! श्री संत मियासाहेब यांची तक्त स्थापना सकाळी ९ वाजता. तसेच कार्तिक मास काकडा आरती समाप्ती होईल.
तर दिनांक २६/११/२०१८ कार्तिक वद्य !! ४ !! श्री नरसिंग महाराज यांची पालखी श्री गुरुपुजे (संदल) करिता गुरुस्थानी उमरा ता. आकोट ( आकोट पासून ९ किलो मीटर अंतर) येथे ह भ प सुभाष बुवा वर्माजी (कुटासा) यांचे प्रमुख सहभागात दुपारी ०१ वाजता निघेल तसेच श्री गुरुपूजे नंतर संध्याकाळी ६ वाजता अग्रसेन चौक, पोपटखेड रोड येथून श्री पालखी मिरवणूक श्री नरसिंग मंदिरात परत येईल.
दिनांक २७/११/२०१८ कार्तिक वद्य !! ५ !! श्री नरसिंग महाराज यांची यात्रा (विविध धार्मिक कार्यक्रम)
दिनांक २८/११/२०१८ कार्तिक वद्य !! ६ !! श्री नरसिंग महाराज यांची पालखी सकाळी ०९ वाजता ह भ.प. सुभाषबुवा वर्माजी (कुटासा) यांचे प्रमुख सहभागात श्री नरसिंग मंदिरातून नगर परीक्रमेसाठी निघेल.व दुपारी ४ वाजता श्री पालखी मिरवणूक श्री मंदिरात परत येईल व नंतर गोपाळकाला (दहीहांडी) तसेच महाप्रसाद होईल.

दिनांक ३०/११/२०१८ कार्तिक वद्य !! ८ !! श्री हरीनाम सप्ताहाची समाप्ती सकाळी ०९ वाजता ह.भ.प. मधुकरबुवा ठाकरे (रोहनखेड) यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ११ वाजता.
दिनांक ०४/१२/२०१८ कार्तिक वद्य !! १२ !! श्री नरसिंग महाराजांचे समाधीस सकाळी ६ वाजता रुद्राभिषेक व सकाळी ९ वाजता श्री गाईची पूजा (गोतांबील) दुपारी १२ वाजता महाप्रसाद.
दिनांक ०५/१२/२०१८ कार्तिक वद्य !! १३ !! श्री संत मियासाहेब यांचे तक्ता समोर काकडा आरती, भजन, गोपाळकाला प्रक्षाळ पूजेचे भजन, रात्री ०८ ते १० पर्यंत.