नवीन सायकलची ३ दिवसांतच चोरी ८ हजारांची अॅटलास कंपनीची होती सायकल – चांदूर रेल्वे पोलीसांत तक्रार दाखल

0
680
Google search engine
Google search engine
(फोटो – चोरीला गेलेली हीच ती सायकल)
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
नवीन घेतलेल्या ८ हजाराची सायकलची केवळ ३ दिवसांतच चोरीला गेल्याची घटना रविवारी (ता. २५) रात्री १२.३० ते १ वाजताच्या दरम्यान घडली. याची चांदूर रेल्वे पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चांदूर रेल्वे शहरातील कुऱ्हा रोडवरील गुरूकृपा मेडीकलचे संचालक योगेश अनिल बजाज (३०) यांनी २२ नोव्हेंबर रोजी अॅटलास कंपनीची नवीन सायकल ७९०० रूपयामध्ये शहरातील एका सायकलच्या दुकानातुन विकत घेतली. व ही सायकल योगेश बजाज स्वत: चालवित होते. मात्र २५ नोव्हेंबरला रात्री १०.३० वाजताच्या सुमारात योगेश बजाज सायकलने मेडीकलमधून घरी गेले असता सायकल घराच्या बाजुला कंपाऊंडजवळ ठेवली होती. त्यानंतर अंदाजे रात्री १२.३० ते १ वाजताच्या दरम्यान योगेश बजाज घराबाहेर आले असता त्यांना सायकल आढळली नाही. त्यामुळे सायकल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सदर घटनेची तक्रार चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलीसांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३८९ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पीएसआय बी. यु. लसंते करीत आहे. चांदूर रेल्वे शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत असुन पोलीस चोरीचा सुगावा लावण्यात यशस्वी होणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.