अकोट शिवसेनेतर्फे “संविधान दिवस” व २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना “सामूहिक श्रद्धांजली”

0
1589
Google search engine
Google search engine

अकोट:
अकोट शिवसेनेच्या वतीने दि.26 ला स्थानिक शिवाजी चौक अकोट येथे शहर पोलीस स्टेशन ठाणेदार गजानन शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत “संविधान दिवस” तसेच २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या “शहीदांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण” कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी शिवसेना गटनेते व सभापती मनिष रामाभाऊ कराळे,शिवसेना जिल्हा महिला संघटिका सौ.मायाताई म्हैसने,जेष्ठ पत्रकार अनंत गावंडे यांनी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण केले व शहीदांच्या विरतेला स्मरण करत कँडल लावून श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.मायाताई म्हैसने यांनी केले यावेळी ठाणेदार शेळके साहेबांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत संविधानाचे महत्व विशद केले तसेच सभापती मनिष कराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या दिवसाच्या सन्मानार्थ दरवर्षी शिवसेनेच्या वतीने २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो..यावेळी उपस्थितांनी सामूहिकरित्या शहीद वीर जवानांना कँडल लावून सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये शिवसेना अनुसूचित जाती जमाती ता.अध्यक्ष विजय अंभोरे,शिवसेना ता.प्रचारक बबलू नांदूरकर,माजी उपशहर प्रमुख विजय ढेपे,गोवर्धन आवारे,शिल्पाताई ढोले,मायाताई मोहिते,गोवर्धन म्हसाळ,युवासेना ता.संघटक कुणाल कुलट,युवासेना शहर संघटक वहिद भाई यांच्यासह अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांची विशेष उपस्थीती होती.या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ठाणेदार शेळके यांनी आयोजकांचे कौतुक केले..कार्यक्रमाचे आयोजन अकोट शिवेसेनेच्या वतीने शिवसेना गटनेते तथा सभापती मनिष कराळे व यांनी केले तसेच सूत्रसंचालन अनंत दादा गावंडे यांनी केले.

कार्यक्रमाला संजय पालखेडे,सातपुते साहेब,सोपान पोहरे,युवासेना उपतालुका प्रमुख अंकुश कुलट,संतोष तायडे,
युवासेना उपतालुका प्रमुख विशाल चौधरी,
युवासेना शहर सरचिटणीस नारायन पोटे,
युवासेना उपतालुका प्रमुख विजय भारसाकळे,
गणेश रेळे,अजय रेळे,कीरण शेंडे,
सुनिल देठे,धनजय गावंडे,शेख सलीम,नितीन काकड,रणजित कहार,गौरव मंगळे,सोपान बोंद्रे,विठ्ठल रेळे,सावंत चावरे,रोहित ठाकूर,सागर अंधारे,योगेश बनसोडे,सुनील कुकडे,गुड्डू शेगोकर,जयदीप चराटे,जमीद भाई,दिलीप मजेठीया,अन्सार खान,अब्दुल जब्बार,बादशाह खान,नईम भाई, शहजाद खान,शाबीर खान,जफर खान,किरण पवार,रशीद खान,बबलू शेख,संजय सोळंके,जिंदाल बागड़े,आंनद तेलगोटे,मंगेश तेलगोटे,हर्षल नहाटे,अमोल बोंन्द्रे यांच्यासह शेकडो सुजाण नागरिक व शिवसेना युवासेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे.