दानापुर येथिल हनुमान प्रसाद साह जनता विघालयात संविधान दिन सप्ताह साजरा ..

0
798
Google search engine
Google search engine

दानापूर/ सुनिलकुमार धुरडे

तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील हनुमान प्रसाद साह जनता विघालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत आज जनता विघालयात संविधान दिन सप्ताह साजरा करण्यात आला . सर्व प्रथम डाॅ .बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .

महाराष्ट्र शासनाच्या न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या बारटी मार्फत बारटी चे महासंचालक कैलास कणसे (भा .प्र. से.),मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे ,साहाय्यक प्रकल्प संचालक राहुल कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा समता दुत शुभांगी लव्हाळे यांनी विद्यार्थ्यांना व विघालयाचे मुख्याध्यापक यांना संविधान प्रञिकेचे वाटप केले व संविधान वाचन करून डाॅ .बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी विघालयाचे मुख्याध्यापक श्री .श्रीराम डाबरे ,पञकार सुनिलकुमार धुरडे व विनोद सगणे, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर माकोडे यांनी केले.