तेल्हारा पोलीस स्टेशन येथे संविधान पुस्तिकेचे बार्टी तर्फे प्रत वाटप

0
655
Google search engine
Google search engine

तेल्हारा :- तेल्हारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत तेल्हारा पोलीस ठाण्यात संविधान दिन सप्ताह संविधान पुस्तिकेची प्रत देऊन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बार्टी संस्थे मार्फत बार्टी चे महासंचालक कैलास कणसे(भा.प्र.से) मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, सहाय्यक प्रकल्प संचालक राहूल कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा समतादूत शुभांगी राजेंद्र लव्हाळे यांनी मार्गदर्शन केले व तेल्हारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास देवरे साहेब यांना संविधान पुस्तीकेची प्रत देण्यात आली यावेळी पत्रकार निलेश जवकार सुनिल धुरडे ,विनोद सगणे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे.