शेती करण्यापेक्षा तरुणांनी व्यवसायाकडे वळावे ; खा.शरद पवार

0
843
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद- कर्मवीर लोहकरे गुरुजी यांच्यां जन्मशताब्दी आम्रत मोहत्सवी वर्ष साजरे करण्यात आले या कार्यक्रमाला खा. शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पवार यांनी शेतकरी कुटूंबातील तरुणांनी शेती करण्यापेक्षा व्यवसायाकडे वळावे असे तरुणांना संबोधीत केले व्यावसायिकाच्या कुटुंबतला आहे तो कुठल्याही जातीचा धर्माचा असला तरी त्याला शैक्षणिक क्षेत्रात संधी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आरक्षणाची गरज आहे असे मत राष्ट्र्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले ते आज कर्मवीर लोहकरे गुरुजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगाव यांनी कार्यक्रमाचे सुनियोजन केले होते यावेळी खासदार विजयसिंह मोहिते -पाटील, माजी खासदार डॉ पदमसिंह पाटील,आमदार दिलीप सोपल माजी,आमदार बबन शिंदे, आमदार राजन पाटील, सोलापूर जिल्हापरिषद अध्यक्ष संजय शिंदे उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,माजी आमदार राजेंद्र राऊत,रश्मी बागल, दीपक साळुंके बळीराम साठे सोलापूर विद्यापीठ कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती बुद्धिमत्ता ही ठराविक लोकांची मक्तेदारी नाही, बुद्धिमत्ता ही सर्वत्र असते, त्या बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देण्याचा काम शैक्षिणक संस्थानी केल पाहिजे. तरच सामान्य कुटुंबातील मूल कुठही यशस्वी होवू शकतातयापुढे शेती एके शेती करुण चालणार नाही,शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण उत्तम घेवून देशात जगात कुठेही जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व दाखवले पाहिजे कर्तृत्व दाखवण्याची संधी मुलांनी घ्यावी कारण त्यातून खऱ्याअर्थाने कुटुंब पुढे येणार आहे.त्यामुळे चांगले शिक्षण घेण्याचे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं यावेळी आरक्षणावर बोलताना शरद पवार म्हणाले की मुस्लिम समाजमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे म्हणून त्याना शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज आहे याबरोबरच सर्व मागास समाज घटकतील लोकांना आरक्षणाची गरज आहे त्यासाठी सरकारने या शैक्षणिक संस्थानच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे.शिक्षणामुळे समाजात सामाजिक ऐक्य राहते ते टिकवण्यासाठी शिक्षणाची गरज आहेज्ञानाची केंद्र मुठभर लोकांच्या हातात राहिली आणि त्याचा लाभ समाजातील ठराविक लोकांना होत असेल तर समाजमध्ये ज्या प्रकारचे सामाजिक ऐक्य आणि सामाजिक विकास होण्याची स्वप्न या आदिच्या पीढिनी बाळगली त्याची पुर्तत होणार नाही म्हणून शिक्षणाची संधी सर्वाना मिळाली पाहिजे असे शेवटी शरद पवार यांनी संगितले.