तेरमध्ये दिवसाढवळ्या वाळू तस्करी ; प्रशासनाचे अभय

0
875
Google search engine
Google search engine

तेरमध्ये दिवसाढवळ्या वाळू तस्करी ; प्रशासनाचे अभय

या फोटोमध्ये वाळू उपसा करणारे मजूर छायाचित्रे घेताना पळून जाताना दिसत आहेत

उस्मानाबाद – तालुक्यातील तेर येथील तेरणा नदी पात्रात उस्मानाबाद लातूर रसत्यालगत काकासाहेब यांच्या शेता समोर दिवसाढवळ्या वाळू तस्करीचा प्रकार सुरू आसून याकडे प्रशासन मात्र जाणीवपूर्वक ढोळेझाक करून वाळू तस्करांना अभय देत असल्याचे दिसत आहे.
सध्या वाळूचे भाव गगणाला भिडलेले असताना तेरणा नदी पात्रात आगदि गावाच्या शेजारी म्हणजे संत गोरोबा काका मंदिर ते पेठ मुख्य रसत्याच्या कडेला काकासाहेब काळे यांच्या शेतासमोर दोन व्यक्ती दिवसा ढवळ्या वाळू काढताना अढळले छायाचित्रे घेत आसताना त्यांनी पळ कढला . एक व्यक्ती बनीयनवर होती तर दुसरी व्यक्ती चप्पल सोडून पळाले .तेरणा नदिपात्रात दाररोज दोन ते तीन छोटा हत्ती भरुन वाळू काढली जात असल्याचे बोलले जात आहे. हि वाळू छोटा हत्ती भरून गावातील रसत्याच्या कडेलाच असलेल्या विंधन विहिर ( बोअरवेलवर )अशा दुष्काळजन्य परस्थीतीतही पाण्याची नासाडी करत वाळू धूतली जाते . हि वाळू गावातच पाच ते सहा हजार रुपये ब्रास दराने विक्री केली जाते वाळू काढणार्या मजूरांना हजार ते दिड हजार रुपये देऊन हा मलीदा लाटला जात आहे.विशेष म्हणजे नदिपात्रातील वाळू ऊपशाचा कसलाही लिलाव किंवा शासकिय कर न भरता हा वाळू उपसा केला जातो मात्र याकडे संबंधीत प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.हा प्रकार गेल्या आनेक दिवसापासून सुरू आसून.प्रसार माध्यमातून वाच्यता झाली कि किरकोळ कार्यवाही करून वाळू तस्करांना अभय दिले जाते. वाळू तस्करांच्या या क्रत्यामुळे नदिपात्रात ठिक ठिकाणी चित्र विचीत्र खड्डे पडल्याचे दिसत आहे. खड्यांच्या शेजारी ऊपलेल्या वाळूंचे ढिगारे दिसत होते.तरी संबांधीत प्रशासन यावर काय कार्यवाही करणार कि नेहमीप्रमाणे जुजबी कार्यवाही करून वाळू तस्करांना अभय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.