स्वं.मधुकररावजी फाटे यांच्या जंयती निमित्त मनसे तर्फे निराधारांना 200 ब्लँकेट वाटप

0
1427
Google search engine
Google search engine

आकोट/ संतोष विणके

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा.जिल्हा अध्यक्ष रविंन्द्रजी फाटे यांचे वडील स्वं.मधुकररावजी उत्तमरावजी फाटे यांच्या जंयती निमित्याने दि.23 नोव्हे.ला शहरातील विविध ठीकाणच्या बेघर गरजुंना 200 हुन अधिक ब्लॕन्केटचे वाटप करण्यात आले .
स्वं.मधुकरजी उत्तमरावजी फाटे यांच्या जंयती निमित् रविंन्द्र फाटे ( मा. जिल्हाअध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) हे दरवर्षी गरजु आणि गोरगरीब व्यक्तिना मदत तथा दैनदिन गरजेच्या वस्तुंचे वाटप करत असतात.
यावर्षी त्यांनी थंडीच्या कडाक्यात उघड्यावर झोपलेल्या बेघर निराधार वृद्ध तथा महीलांना मोफत ब्लँकेट देत आपुलकीचा उबदार स्नेह जागवला.यावेळी त्यांनी शहरातील बस स्टॕन्ड,नेहरु पार्क,रेल्वे स्टेशन चौक,न्यायालया जवळील परीसर,कॉटन मार्केट आदी परीसरात उघड्यावर थंडीत कुडकुडणाऱ्या बेघरांना ब्लँकेटची उब दिली

.यावेळी हाडं गोठवणाऱ्या या थंडीत अचानक मिळालेल्या गरम चादर तथा ब्लँकेटसनी या बेघर गरजवंताच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद ओसंडुन वाहत होता.संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरीत असणाऱ्या मनसेच्या रविद्र फाटे यांना या निराधारांनी याप्रासंगी भरभरुन आशिर्वाद दिला.वंचित गरजवंताना वडीलांच्या जयंती दिना निमित्त केलेल्या या मदतीमुळं आपन समाजाचं काही देणं लागतो ही भावना रविंद्र फाटे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

कार्यक्रमाला मार्गदर्शक रविंन्द्रजी फाटे ( मा. जिल्हाअध्यक्ष मनसे ) ॲड.श्रीरंग दादा तट्टे , ॲड. नंदकिशोरजी शेळके , .प्रदिपजी गांवडे हे प्रामुख्याने हजर होते तर
या कार्यक्रमाला शंशाक कासवे , धंनराज गांवडे , सुरज वर्मा , शाकिर खान , पुष्पक चेडे ,रविंन्द्र गांवडे शुभम देशपांडे , तेजस लेघे ,अजय शर्मा व यासह मनसेचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .असे मनसेचे अजय शर्मा यांनी कळवले आहे.