आज श्री संत नरसिंग महाराज यात्रेनिमित्त पालखीची नगर परीक्रमा गोपाळकाला व दहीहंडी उत्सव

0
1078

आकोट/संतोष विणके

आकोट नगरीचे ग्रामदैवत श्री सद्गुरू संत नरसिंग महाराज यांच्या यात्रेनिमित्त आज दिनांक 28 नोव्हेंबर 2018 बुधवारला गोपाळकाला व दहीहंडी उत्सव होणार असून यानिमित्य मियासाहेब व नरसिंग महाराजांच्या पालखीची सकाळी ९ वा.पासुन नगर प्रदक्षीणा होणार आहे.गोपालकाला व दहीहंडी उत्सवासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त आकोटात दाखल होणार आहेत.तसेच गोपाळकाल्याचा लाभ ही घेणार आहेत त्यामुळे आकोट परिसर भक्ती सागराने न्हाहून निघणार आहे यात्रेसाठी ठीकठिकाणाहुन दिंड्या तथा पालख्या कालपासुनच दाखल होण्यास सुरवात झाली आहे.

अकोट वासियांचे आराध्य दैवत असलेले सद्गुरु श्री संत नरसिंग महाराज यात्रेला कार्तिक वद्य 24 नोव्हेंबर 2018 रोज शनिवार पासुन प्रारंभ झाला असुन दि.5 डिसेंबर 2018 पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे कार्तिक वद्य 6 दिनांक 28 नोव्हेंबर 2018 रोज बुधवार ला श्री संत नरसिंग महाराजांची पालखी सकाळी सात वाजता ह-भ-प श्री सुभाष रामचंद्र वर्मा यांचे प्रमुख सहभागातून मंदिरातुन नगरप्रदक्षिणा करणार आहेत त्यामध्ये मिंया साहेबांच्या गादीची व त्यांची महाराज यांची पालखी राहणार आहेत

त्यानंतर दुपारी चार वाजता मंदिरातश्री संत नरसिंग महाराज यात्रेनिमित्त उद्या गोपाळकाला श्री सद्गुरू संत नरसिंग महाराज यात्रेनिमित्त दिनांक 28 नोव्हेंबर 2018 बुधवारला गोपाळकाला होणार असून पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त आकोटात दाखल होणार आहेत गोपाळकाल्याचा लाभ घेणार आहेत त्यामुळे आकोट परिसर भक्ती सागराने नाहून निघणार आहे अकोट वासियांचे आराध्य दैवत असलेले सद्गुरु श्री संत नरसिंग महाराज यात्रेला कार्तिक वद्य 24 नोव्हेंबर 2018 रोज शनिवार ते 5 डिसेंबर 2018 पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

त्याचप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे कार्तिक वद्य 6 दिनांक 28 नोव्हेंबर 2018 रोज बुधवार ला श्री संत नरसिंग महाराजांची पालखी सकाळी सात वाजता ह-भ-प श्री सुभाष रामचंद्र वर्मा यांचे प्रमुख सहभागातून मंदिरात मंदिरातून नगरप्रदक्षिणा करणार आहेत त्यामध्ये मीया साहेबांच्या गादीची व नरसिंग महाराज यांची पालखी राहणार आहेत. त्यानंतर दुपारी चार वाजता मंदिरात पालखी परत येऊन संस्थानचे अध्यक्ष सतीश गुणवंतराव आसरकर यांचे उपस्थितीत व हभप सुभाष वर्मा यांचे काल्याचे किर्तन व गोपाळकाल्याचा उत्सव होईल त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे असे मंदिराचे विश्वस्त यांनी कळवले आहे